Mango Barfi Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Mango Barfi Recipe : आंब्याच्या मोसमात घरबसल्या बनवा चविष्ट मँगो बर्फी, पाहूयात रेसिपी

Mango Barfi : रसाळ आंबे खूप आवडतात. या मोसमात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे खायला मिळतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Mango Barfi : रसाळ आंबे खूप आवडतात. या मोसमात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे खायला मिळतील. बरेच लोक विशेषतः या हंगामाची प्रतीक्षा करतात. कारण या मोसमात रुचकर आणि रसाळ आंबे चाखता येतात. आंब्याचा अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये समावेश करता येतो.

आंब्यापासून बनवलेले कैरी पन्ह, मँगो (Mango) शेक, आईस्क्रीम किंवा मँगो स्मूदी असे सर्व प्रकारचे पदार्थ (Food) खायला सर्वांनाच आवडतात, पण आंब्यापासून बनवलेल्या बर्फीची चव आणि मजा वेगळी असते.

साहित्य -

  • 4-5 ताज्या आंब्याचा रस

  • 1-2 दूध (Milk)

  • 1 कप मावा

  • 1 कप साखर (Sugar)

  • 1 टीस्पून वेलची पूड

  • 1/2 कप काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे सजावटीसाठी

पद्धत -

  • सर्व प्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये आंब्याचा रस घाला आणि शिजू द्या. थोड्या वेळाने ढवळत राहा आणि घट्ट होऊ द्या.

  • मिश्रण हलव्यासारखे घट्ट झाल्यावर किंवा आंब्याचा रस बाजूने निघू लागल्यावर त्यात दूध घाला मिक्स करा आणि मावा घाला. आता हे मिश्रण सतत ढवळत असताना शिजवा. पण लक्षात ठेवा की जास्त वेळ शिजवू नका नाहीतर आंबा बर्फी कडक होईल.

  • आता गॅस बंद करून मिश्रण आणखी 2-3 मिनिटे परतून घ्या. तयार मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर त्यात वेलची पूड आणि 2-2.5 कप साखर घालून मिक्स करून मऊ मळून घ्या.

  • आता बर्फीच्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडी साखर टाकून ती चांगली ग्रीस करा. तयार बर्फीचे मिश्रण या प्लेटमध्ये ओता आणि हाताच्या मदतीने पसरवा. वरून चिरलेले काजू, पिस्ता आणि बदाम टाकून हलके दाबून ठेवा आणि सेट होण्यासाठी साधारण 1 तास ठेवा.

  • बर्फी सेट झाल्यावर त्याचे तुकडे करा. उसापासून बनवलेल्या या आंबा बर्फीची चव एकदम वेगळी असते.

आंबा बर्फी कमी तापमानात 5-6 दिवस टिकते आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास 20-26 दिवस चांगली राहते. आंब्याऐवजी तुम्ही इतर कोणत्याही हंगामी फळाचा लगदा घेऊन बर्फी तयार करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT