मुंबई : हल्ली सगळ्यांना नवनवीन गोष्टी करायला आवडतात घर स्वच्छ ठेण्यापासून ते घरात नवनवीन वस्तूंचा समावेश करण्यापर्यंत. इतरांसारखे आपले घर सुद्धा नवीन दिसायला हवे असे तुम्हाला देखील वाटत असेल किंवा आपणही आपल्या घराला नवा लुक देण्याचा विचार करीत असाल, परंतु आपले बजेट कमी असेल तर आपण आपल्या कला-कौशल्याचा वापर करायला हवा. घरातील जुन्या किंवा टाकून दिलेल्या भंगारातून आपण अत्यंत सुंदर वस्तू बनवू शकता व आपले घर नव्याने सजवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
हे देखील पहा -
अशाप्रकारे बनवा सुंदर घर
१. जुन्या दाराचे नवे रूप -
जुन्या फर्निचरच्या बाजारातून (Market) सहजतेने तुम्हाला लाकडी दरवाजे मिळतील. तुम्ही फक्त एवढेच करावयाचे आहे की, कोणत्याही कार्पेटरकडून तो दरवाजा दुरुस्त करून चमकवून घ्या. आता जवळपास नव्या आलेल्या या जुन्या दरवाजाने आपण टेबल टॉप, रुम डिव्हायडर वापोट्रेट फ्रेम बनवू शकता.
२. सुकलेल्या पानांनी आणा घराला शान -
ताजी रंगीबेरंगी रोपे (Plant) नेहमीच सुंदर दिसतात पण सुकलेल्या पानांनीही घराची शोभा वाढवता येऊ शकते. कोणत्याही बागेत जाऊन पिंपळाची मोठमोठी पाने गोळा करा व ती एखाद्या पुस्तकात दाबून सुकवून घ्या. ही वाळलेली पाने घरात लॅपशेडप्रमाणे लटकवा हवे तर यांना गोल्ड या सिल्व्हरने पेंट करून फ्रेमही करू शकता.
३. पुस्तकांनी वाढवा सौंदर्य -
पुस्तकाची आवड असणाऱ्यांना जुनी पुस्तकें (Books) खूप जवळची वाटत असतात. अशावेळी एखाद्या जुन्या कादंबरीतूनच एक आर्टपीस का तयार करू नये आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकांची पाने हवी तर फ्रेम करा वा ती पाने वेगवेगळ्या आकारात घडी घालून सीलिंगला लटकवा. जेव्हा आपले लक्ष या पानांवर जाईल तेव्हा नक्की आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटेल.
४. जुन्या साड्यांचा उपयोग -
ट्रेंडनुसार आपण अनेकदा नवनवीन साड्यांची खरेदी करत असतो. त्यामुळे जुन्या साड्या अशाच पडून राहतात. व त्या टाकून देण्याची सुद्धा आपली इच्छा नसते. अशावेळी आपण जुन्या साड्यांपासून घराच्या खिडक्यांसाठी पडदे तयार करू शकता. त्यामुळे घराला नवीन रूप मिळेल व जुन्या साड्यांचा वापर देखील होईल.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.