Makar Sankranti 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2024 : तब्बल ७७ वर्षांनंतर जुळून आला शुभ संयोग! या ५ राशी ठरतील नशिबवान, पडेल पैशांचा पाऊस

Makar Sankranti 2024 Horoscope : यंदा मकर संक्रांतीला ७७ वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार रवि आणि वरीयान योग निर्माण होत आहे.ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे त्याचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते.

कोमल दामुद्रे

Surya Gochar In Makar Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे त्याचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. अशातच १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत संक्रमण करतो त्याला मकर संक्रांत म्हणतात.

शास्त्रानुसार सूर्य कुंडलीत बलवान असेल तेव्हा त्याचे शुभ परिणाम मिळतील. यंदा मकर संक्रांतीला ७७ वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार रवि आणि वरीयान योग निर्माण होत आहे. तसेच ५ वर्षांनंतर मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण हा सोमवारी आला आहे. त्यामुळे सूर्याचे संक्रमण ५ राशींसाठी लकी ठरणार आहे. आर्थिक (Money) आणि कौटुंबिक (Family) बाबतीत खूप सकारात्मक असणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्य गोचर सकारात्मक राहील.

1. मेष

सूर्याचे संक्रमण मेष राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी आणि यश मिळू शकते. करिअरमध्ये व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी अनेक नव्या संधी मिळतील. परदेशातून जास्त नफा मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक फुलेल.

2. वृषभ

करिअरच्यादृष्टीने हे वर्ष अधिक चांगले असणार आहे. परदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. गुंतवणूक करुन चांगले पैसे कमावू शकता. जोडीदारासोबतचे नाते अधिक सकारात्मक असेल.

3. सिंह

सूर्याचे संक्रमण सिंह राशीसाठी स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्यास मदत करेल. व्यवसायात अधिक नफा होईल. कामाच्या ठिकाणी घवघवीत यश मिळेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

4. वृश्चिक

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. प्रवासामुळे अनेक लाभ होतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात तुमची काम करण्याची इच्छा अधिक वाढेल.

5. मीन

करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल. प्रमोशनही चांगल्या प्रकारे मिळेल. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी अधिक उत्साहात काम कराल. आर्थिक दृष्टीकोनातून चांगले लाभ मिळतील. नात्यात प्रेमाची भावना निर्माण होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT