Mahindra SUV  Saam Tv
लाईफस्टाईल

Mahindra Electric Car: महिंद्राच्या 'या' कारवर भरघोस सूट! SUV कारवर मिळतेय ३.५ लाखांपर्यंतची सूट

Bharat Jadhav

Diwali Festive Offers On Electric Cars:

दिवाळीच्या हंगामात अनेक कार कंपन्या वाहनांच्या किंमतीमध्ये सूट देत असतात. यंदाच्या दिवाळी सणाच्या वेळी तुमची दिवाळी गोड करण्यासाठी मंहिद्रा कंपनीनेही एक ऑफर आणलीय. आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपल्या वाहनांवर सणासुदीच्या हंगामात मोठी सूट दिलीय. (Latest News)

कंपनीने आपल्या एकमेव पूर्ण इलेक्ट्रिक SUV,XUV400 वर मोठी सूट दिलीय. ही सवलत ग्राहकांना रोख सवलत आणि अधिकृत अॅक्सेसरीजच्या स्वरूपात दिली जाईल. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या विविध व्हेरियंटवर १.५ लाख ते ३.५ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप ईएल मॉडेलवर सर्वाधिक ३.५ लाख रुपयांची सूट दिली जातेय. तर बेस मॉडेलवर १.५ लाख रुपयांपर्यंतची रोख सूट मिळणार आहे. तुम्ही सवलतीच्या रकमेत फक्त ५० हजार रुपये अधिक जोडल्यास त्या रक्कमेत मारुती अल्टो K10 करा घरी आणू शकतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारची किंमत ४ लाख सुरुवात होते. Nexon EV प्रमाणे, तुम्ही Mahindra XUV400 दोन बॅटरी पॅक मॉडेल्समध्ये खरेदी करू शकता. या कारमध्ये ३४.५ kWh आणि ३९. ४kWh बॅटरी पॅकचे पर्याय आहेत. ३४.५ kWh बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यावर ३७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते.

तर ३९.४kWh बॅटरी पॅक मॉडेलची रेंज म्हणजेच ४५६ किलोमीटर पर्यंत ही कार धावते. यासह, कंपनी ५० kW DC फास्ट चार्जर, ७.२kW AC चार्जर आणि ३.३kW घरगुती चार्जरचा पर्याय देत आहे. या कार तुम्ही डीसी फास्ट चार्जरसह केवळ ५० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज करू शकता.

XUV400 मध्ये ६० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स आहेत. यामध्ये ७-इंच टचस्क्रीन प्रणाली, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्ड करण्यायोग्य ORVM, सिंगल-पेन सनरूफ आणि पुश-बटण स्टार्ट-स्टॉप यांसारख्या फीचर्स या कारची आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात ६ एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC)आणि रिअर पार्किंग कॅमेरा देखील देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT