Mahashivratri 2024, Kalsarp Dosh Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2024 : कालसर्पदोषातून होईल सुटका! महाशिवरात्रीला करा हे उपाय

Kalsarp Dosh Remedies : जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू हे ग्रह एकाच राशीत आले असतील तर कालसर्प दोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहूला काल तर केतूला सर्प म्हणून ओळखले जाते.

कोमल दामुद्रे

Kalsarp Dosh :

हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी शंकराची मनोभावे पूजा आणि अर्चना केल्याने इच्छित फळ मिळते.

यंदा हा सण ८ मार्चला शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू हे ग्रह एकाच राशीत आले असतील तर कालसर्प दोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहूला काल तर केतूला सर्प म्हणून ओळखले जाते. कालचा अर्थ होतो मृत्यू तर सर्पचा अर्थ साप. जर तुमच्याही कुंडलीत कालसर्प दोष असेल तर महाशिवरात्रीला (Mahashivrtari) हे उपाय (Remedies) करा.

  • महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घाला. या पाण्याने आंघोळ करा.

  • विधीनुसार पूजा करुन चांदीच्या किंवा तांब्याच्या नागांची जोडी मंदिरात किंवा वाहत्या पाण्यात दान करावी. असे केल्याने कालसर्प दोषांपासून मुक्तता होईल.

  • तसेच असे केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. दोष दुर करण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करा. यामुळे तुमचे अनेक कामे मार्गी लागतील.

  • ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असतो त्या व्यक्तीला आयुष्यात अधिक संघर्ष करावा लागतो. तसेच मानसिक (Mental Health) आणि शारीरिक ताण येतो.

  • स्वप्नात अनेकदा या व्यक्तींना मृत व्यक्ती दिसतात. तसेच घरात सतत भांडण होणे, डोकेदुखी, त्वचारोग यांसारख्या समस्या उद्भवतात.

1. या मंत्राचा करा उच्चार

  • ओम नागदेवताय नम:

  • ॐ नवकुलाय विद्यामहे विषदन्ताय विद्यामाया तन्नो सर्प: प्रचोदय ।

  • ओम क्रौं नमो अस्तु सर्पभ्यो कालसर्प शांती कुरु कुरु स्वाहा || सर्प मंत्र ||

  • ओम नमोस्तु सर्पेभ्य ये के च पृथ्वीमनु ये अंतरीक्षे ये दिवि तेभ्य सर्पेभ्य नमो:

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT