राज्यात कुपोषित मुलांची संख्या सर्वाधिक Saam Tv
लाईफस्टाईल

राज्यात कुपोषित मुलांची संख्या सर्वाधिक

देशात एकूण ३३ लाख २३ हजार ३२२ मुलं कुपोषित आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर समस्येला आपण अनेक वर्षांपासून सामोरे जात आहे. लहान वयातच मुलांना चांगला आहार मिळणे आवश्यक आहे. मात्र गरीबीमुळे लाखो मुलांना पोषक आहार मिळत नाही. राज्यात कुपोषित मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३३ लाखांहून अधिक मुलं कुपोषित असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये १७.७ लाख मुलं गंभीर कुपोषित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मुलं ही महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबाद मंत्रालयाने पीटीआय वृत्तसंस्थेद्वारे एका आरटीआयमधील उत्तरात म्हटले की, देशात एकूण ३३ लाख २३ हजार ३२२ मुलं कुपोषित आहेत.

हे देखील पहा -

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गरीबांमध्ये कोरोनामुळे पोषण संकट आणखीन वाढले. १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत देशात १७.७६ लाख मुलं गंभीर कुपोषित आणि १५.४६ लाख मुलं अल्प कुपोषित होते. परंतु गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरच्या तुलनेत हा आकडा वाढला आहे. नोव्हेंबर २०२० आणि १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान एसएएम मुलांचा आकडा ९१% वाढला आहे. जो आता ९ लाख २७ हजार ६०६ हून वाढून १७.७६ लाख इतका झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित मुलांचा आकडा आहे. महाराष्ट्रातील ६.१६ लाख मुलं कुपोषणाचा शिकार झाली आहेत. ज्यामधील १ लाख ५७ हजार ९८४ मुलं अल्प कुपोषित असून ४ लाख ५८ हजार ७८८ मुलं गंभीर स्वरुपात कुपोषित आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे. बिहारमध्ये ४ लाख ७५ हजार ८२४ मुलं कुपोषित आहेत.

तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून येथे ३.२० लाख एकूण मुलं कुपोषित आहेत.या यादीत राजधानी दिल्ली देखील मागे नाही आहे. दिल्लीत १.१७ लाख मुलं कुपोषणाचा शिकार झाली आहेत . देशात भारत ग्लोबर हंगर इंडेक्समध्ये १०१ स्थानावर आहे. यामध्ये भारताने शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत जागतिक उपासमार निर्देशांकात ९४व्या क्रमांकावर होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT