AI, Digital Health And Precision Health New Era Of Healthcare Innovation In Maharashtra saam tv
लाईफस्टाईल

AI, डिजिटल हेल्थ अन् प्रिसिजन हेल्थ; महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात

Maharashtra Impact and Innovation Hub : AI, डिजिटल हेल्थ आणि प्रिसिजन हेल्थच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नवोपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हबच्या माध्यमातून स्थानिक आरोग्य गरजांनुसार उपाय विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रात AI डिजिटल हेल्थ आणि प्रिसिजन हेल्थचा नवा उपक्रम

  • महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब नेमकं काय आहे

  • महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नवोपक्रमाचे नवे मॉडेल

महाराष्ट्र आरोग्य नवोपक्रम विकसित करण्याच्या, त्यांची चाचणी घेण्याच्या आणि मोठ्या प्रमाणावर राबवण्याच्या नव्या मॉडेलचा पाया घालत आहे. हे असं मॉडेल जे नागरिकांच्या गरजांपासून सुरू होते आणि आरोग्य परिसंस्थेतील विविध गोष्टींना एकत्र आणते. महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब, आरोग्य नवोपक्रम आणि गुणवत्ता सुधारणा यासाठीचा राज्यस्तरीय मंच आहे.या दृष्टिकोनातून विकसित केला जातोय. स्थानिक आरोग्य प्राधान्यक्रम ओळखत समुदायांसोबत मिळून उपाय तयार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब शासन, आरोग्यसेवा पुरवठादार, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक आणि विकास भागीदार यांची तज्ज्ञता एकत्र आणून महाराष्ट्र शासनाच्या “हेल्थ फॉर ऑल” या उद्दिष्ट पूर्ण करणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल आरोग्य, डेटा आणि प्रिसिजन हेल्थ यांसह नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या शक्यता अजमावताना हा उपक्रम विद्यमान यंत्रणा बळकट करणारा आहे.

हबसाठी एक महत्त्वाची संधी म्हणजे खासगी आरोग्यसेवा परिसंस्थेची व्याप्ती आणि क्षमता सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांशी जोडणे. विविध भागधारकांना एका समान मंचावर आणून, हे मॉडेल व्यवहार्य, परवडणारे, सुलभ आणि स्थानिक गरजांना अनुसरून उपाय विकसित करण्यास मदत करू शकते. हा उपक्रम प्रगल्भ होत असताना सामुदायिक आरोग्य गरजांशी निगडित स्थानिक कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विकासाच्या संधीही अजमावल्या जातील.

हब आकार घेत असताना, नवोपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर परिणामात रूपांतर करण्यात महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर राहण्याची संधी आहे.शासन, समुदाय, नवोन्मेषक आणि भागीदार यांना हबच्या माध्यमातून एकत्र आणून, काय परिणामकारक आहे याची चाचणी घेणे, त्वरित शिकणे आणि महाराष्ट्रभर आरोग्यसेवांची गुणवत्ता व समानता सुधारणारे उपाय मोठ्या प्रमाणावर राबवणे हे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीच्या CJP आंदोलनात 3 बड्या नेत्यांसह कोणाकोणाला घेतले ताब्यात? यादी आली समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत आंदोलकांची धरपकड

Orange Benefits: आंबट- गोड संत्रा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

Eye Twitching : एका डोळ्याचे फडफडणे काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ, वेळीच ओळखा 'हे' संकेत

Tea Tips : चहासोबत चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ! नाहीतर आजारांना मिळेल आमंत्रण

SCROLL FOR NEXT