Lunar eclipse donation SAAM TV
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहणाच्या वेळी या गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ; आयुष्यातील अडचणींपासून मिळेल मुक्ती

Lunar eclipse donation: चंद्रग्रहणाच्या दिवशी पांढऱ्या वस्तू, चांदी, मोती, अन्न आणि धनाचं दान केल्याने चंद्र दोष कमी होऊन मानसिक शांती, सुख आणि समृद्धी मिळते, अशी ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

चंद्रग्रहणाचा दिवस दान आणि धार्मिक उपायांसाठी विशेष मानण्यात येतो. चंद्रग्रहणाच्या वेळी काही वस्तूंचे दान केल्याने चंद्र दोषांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात. त्याचप्रमाणे जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते अशी मान्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी भक्तीने आणि नियमांचं पालन करून केलेले उपाय व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक प्रभाव दूर करण्यास उपयुक्त मानले जातात. चंद्रग्रहणाच्या निमित्ताने कोणत्या गोष्टींचं दान केल्यास शुभ परिणाम मिळतात ते जाणून घेऊया.

पांढऱ्या वस्तूंचं दान

ज्योतिषशास्त्रात चंद्राचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. असं मानलं जातं की, या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्ही तांदूळ, साखर, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंचे दान करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडेही दान करू शकता.

चांदी किंवा मोत्याचं दान

चंद्रग्रहणाच्या दिवशी चांदी किंवा मोत्याचं दान करणं हे शुभ मानलं आहे. या दिवशी या वस्तू दान केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू किंवा शनीचा चंद्रावर प्रभाव दिसून येतो त्यांच्यासाठी हे दान विशेषतः फायदेशीर ठरू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी आणि मोती चंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे या गोष्टींचं दान केल्याने तुमच्या आयु्ष्यात असलेल्या समस्या कमी होतात.

अन्नाचं दान

हिंदू धर्मामध्ये अन्नदान करणं हे सर्वात मोठं दान मानण्यात आलं आहे. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी गरजूंना अन्न दिल्याने चंद्राचा आशीर्वाद मिळतो. अशावेळी तुम्ही गहू, तांदूळ किंवा डाळीसारखे कच्चं धान्य देखील दान करू शकता.

धनाचं दान

चंद्रग्रहणाच्या दिवशी पैसे दान करणंही खूप शुभ मानण्यात येतं. या दिवशी पैसे दान केल्याने तुम्ही इतरांना मदत करता आणि देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त करता. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या दिवशी पैसे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss: पोटाची चरबी झटक्यात वितळवतील या छोट्या बिया; कसं कराल सेवन

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेत प्रवेशासाठी नवी नियमावली लागू

Mumbai Local Megablock: रेल्वे प्रवाशांचे रविवारी होणार हाल; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra News Live Update : 'भेट म्हणजे पक्षप्रवेश नाही'; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT