low cost treatment of depression saam tv
लाईफस्टाईल

Explainer : नैराश्यावर कमी खर्चात उपचार; अॅनेस्थेशियाचं औषधं आणि ऑरेंज ज्यूस एकत्र दिल्यास फरक पडतो? तज्ज्ञाचं मत जाणून घ्याच

डिप्रेशन किंवा मानसिक आरोग्याबाबत एक कमी खर्चिक ड्रग असल्याचं समोर आलं आहे. ऑरेंज ज्यूस आणि केटामीन हा डोस कमी खर्चिक असून तो पुढच्या काळात रूग्णांसाठी फायदेशीर ठरेल याबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलंय ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

अजूनही आपल्या समाजात मानसिक आरोग्याबाबत फारशी जागृती नाहीये. त्यामुळे याबाबत होणाऱ्या औषधोपचांराबाबत देखील पुरेशा प्रमाणात जागृती झाली नाहीये. अशातच आता एक डिप्रेशन किंवा मानसिक आरोग्याबाबत एक कमी खर्चिक ड्रग असल्याचं समोर आलं आहे. याबाबत लोकांना फारशी माहिती नाही. याचे धोके लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रूग्णालयातील रूग्णाला याचा डोस देण्यात आला. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर या औषधाचा रूग्णावर चांगला परिणाम दिसून आला.

काय आहे हे नेमकं औषधं?

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रूग्णालयात एका रूग्णाला मानसिक समस्या जाणवत होती. यावेळी रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला केटामीन हे औषधं दिलं. मात्र हे औषध डॉक्टरांनी त्याला ऑरेंज ज्यूससोबत देण्यात आलं. यावेळी काही वेळ त्याला डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आलं. यावेळी रूग्णाचं हार्ट रेट, पल्स, ब्लड प्रेशर यांचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर रूग्णामध्ये चांगले बदल दिसून आले. इतकंच नाही तर त्याचा त्रास कमी होऊन त्याने त्याची परिक्षाही दिली.

दरम्यान ऑरेंज ज्यूस आणि केटामीन हा डोस कमी खर्चिक असून तो पुढच्या काळात रूग्णांसाठी फायदेशीर ठरेल याबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलंय ते पाहूयात.

औषधाचा शॉर्ट टर्म इफेक्ट

याबाबत दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दर्शन कलाल म्हणाले, केटामीन हे एक ॲनेस्थेटीक ड्रग असून त्यामध्ये अँटी डिप्रेसंट प्रॉपर्टी देखील आहे. या ड्रगचा डोस दिल्यानंतर त्याचा शॉर्ट टर्म इफेक्ट पाहायला मिळू शकतो. जितक्या लवकर या ड्रगचा इफेक्ट डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीवर चांगल्या प्रमाणात होतो पण हा फक्त शॉर्ट टर्म असतो. तसंच आत्महत्येचे विचार सुधारण्यात पण याचा उपयोग होऊ शकतो . एखाद्या मानसिक रूग्णाला हा डोस द्यायचा झाला तर त्याला यानंतर काही वेळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं बंधनकारक असेल.

रूग्णाला या औषधाचा डोस दिल्यास त्याचा दिर्घकाळ परिणाम दिसणार नाही. जरी हा डोस रूग्णाला दिला तरी त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे.
डॉ. दर्शन कलाल, मानसोपचारतज्ज्ञ, राम मनोहर लोहिया रूग्णालय, दिल्ली

डॉ दर्शन यांनी पुढे सांगितलं की, रूग्णाला नेमका काय काय मानसिक आजार आहे ते शोधून त्याला उपचार द्यावे लागतात. डिप्रेशन सारख्या आजारात सर्व उपचार फेल झाल्यास संबंधित व्यक्तीला IV केटामीन देण्याचा विचार केला जाऊ शकतो. जरी ही उपचार पद्धती कमी खर्चिक असली तरीही एका डोसने रूग्णामध्ये लाँग टर्म इफ़ेक्ट टिकत नाही. अशावेळी रूग्णाला अजून काही डोसची गरज भासू शकते.

केटामीन हे औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकत नाही. या औषधाची किंमत फार कमी आहे. मात्र याचा इफेक्ट होण्यासाठी किती काळ जावा लागतो हे देखील आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.

अशा पद्धतीचे उपचार किती योग्य?

मुंबईच्या वांद्रे परिसरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांच्या सांगितलं की, ऑरेंज ज्यूससोबत केटामीन ड्रग दिल्याने रूग्णाला फायदा होऊ शकतो. मात्र यापूर्वी रूग्णाला नेमकी काय समस्या आहे आणि त्यावर काय उपचार केले जाऊ शकतात, यावरून हा केटामीनचा डोस द्यावा की नाही हा निर्णय घेतला पाहिजे. शिवाय हा डोस दिल्यानंतर रूग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे. हा एक कमी खर्चिक पद्धतीचे उपचार असून रूग्णाला याचे अजून डोस द्यावे लागू शकतात. मात्र हे पूर्णपणे रूग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT