Weight loss tips for busy lifestyle CIDRAP/ health
लाईफस्टाईल

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Lose Weight Without Exercise : आपल्या शरीरातील काही नैसर्गिक बदलही अतिरिक्त वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. ही कारणे ओळखल्यास तुम्ही व्यायाम न करता तुमचे वजन कमी करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या सर्वांनाच नेहमी एक फिट शरीर हवं असतं. जे आपल्या पर्सनॅलिटिला अधिक आकर्षक बनवतं. पण हे फिट आणि आकर्षक शरीर मिळवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो. या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे वजन वाढते आणि डायबिटीज, थायरॉईड, पीसीओडी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. आणि याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटिवरही होतो. खरं तर शरीरातील काही नैसर्गिक बदलांमुळे देखील वजन वाढते. म्हणून हे बदल ओळखून व्यायामासह शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

बऱ्याचजणांना बाहेर पडल्यावर सारखं काही न काही खायची सवय असते. यामध्ये जास्तीत जास्त पॅकेज्ड फूड्सचा समावेश असतो. या पॅकेज फूड्समध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि ते अतिरिक्त वजन वाढीचे मोठे कारण ठरते. यामुळे शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी पॅकेज्ड फूड्स खाणं टाळलं पाहीजे.

काहीवेळा खाण्यापिण्याच्या वेळींवर दुर्लक्ष केले जाते. अवेळी खाणे किंवा पुरेसे न जेवणे यामुळे पोटात, छातीत जळजळ होते. आपण काही असे पदार्थ खातो ज्यामुळे अॅसिडिटी होते. ही अॅसिडिटी देखील वजन वाढीचे एक कारण आहे. यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि अतिरीक्त चरबी वाढते. जास्त साखर असलेले, प्रक्रिया केलेले, तळलेले, चरबीयुक्त मांस आणि डेअरी प्रोडक्ट शिवाय मैदा, ट्रान्स फॅट असलेले बेकरी उत्पादने असे जळजळ वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांनी या सर्व गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण दरमहा येणाऱ्या मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल घडत असतात आणि हे देखील वजन वाढीचे एक मुख्य कारण आहे. याकाळात मूडस्विंग्समुळे स्त्रियांना सतत बाहेरचे तेलकट चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. म्हणूनच विशेषत: स्त्रियांनी वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT