Fat Gain After 30: तिशीनंतर वाढत्या वजनावर नियंत्रण कसं ठेवायचं? करा 'हे' प्रभावी उपाय

Fat Loss Tips Womens: महिलांना वाढत्या वयानुसार त्यांच्या वाढत्या फॅटची चिंता होत असते. ही समस्या शंभर पैकी ९० टक्के महिलांना असू शकते. त्यात ३० वर्षानंतर मेटाबॉलिज्म स्लो होतं.
Fat Loss Tips Womens
Fat Gain After 30ai
Published On

महिलांना वाढत्या वयानुसार त्यांच्या वाढत्या फॅटची चिंता होत असते. ही समस्या शंभर पैकी ९० टक्के महिलांना असू शकते. त्यात ३० वर्षानंतर मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे तुमचं शरीर वाढत्या वजनाला आणि वाढत्या फॅटला रोखू शकत नाही. महिला त्यांच्या २० वयात या समस्यांना सहज सोडवू शकतात. मात्र पुढे त्यांना त्यांचं शरीर साथ देत नाही. विशेष:त 40 वर्षांनंतर महिलांमध्ये फॅट हा अचानक वाढायला लागतो. आणि त्यावर कितीही उपाय केले तरी तो कमी होत नाही.

Fat Loss Tips Womens
8 मार्च Womens Day कधी, का आणि कसा सुरू झाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

महिलांमध्ये फॅटचे प्रमाण कशाने वाढते?

महिला असो वा पुरुष प्रत्येकाला वाढत्या फॅटची भिती असते. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे महिलांमधील वाढता फॅट. त्यात अयोग्य पदार्थांचे सेवन, पोषक तत्वांची कमतरता, फिजीकल अॅक्टीविटीची कमी, हार्मोनल असंतुलन सारखे फॅक्टर्स हे वाढत्या फॅटला जबाबदार असतात. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही तुमच्यासाठी योग्य डाएट पद्धती आणल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.

प्रोटीन नाश्ता

तुमच्या रोजच्या आहारात तुम्हाला योग्य पोषक तत्व मिळणे तुमच्या शरीराची गरज आहे. तुमच्या शरीरात जर योग्य प्रमाणात प्रोटीन असतील तर तुम्हाला इतर समस्यांना तुलनेन कमी सामोरं जावं लागतं. तसचं वजन कमी करण्यासाठी किंवा वाढता पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्ही योग्य पदार्थांचे वेळीच सेवन करणं आवश्यक असतं. त्यामध्ये अंडी, ओट्स, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, बिया, चिकन यांसारखे पदार्थ रोजच्या आहारात असणं महत्वाचं आहे.

तुमचं डाएट

तुम्ही यात कोणतही वेगळं डाएट फॉलो करण्याची गरज नाही. फक्त योग्य आहार आणि बाहेरचे तेलकट पदार्थ, जंक फुड, गोड हे वयाच्या ३० ते ४० मध्ये खाणं टाळलं पाहिजे.

पाण्याचे सेवन वाढवा

पाणी तुमच्या शरीरातले मेटाबॉलिज्म वाढवण्याचं काम करत असतो. जर तुमचं मेटाबॉलिज्म चांगलं असेल तर तुमचा फॅट वाढत नाही. त्यासाठी महिलांनी रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Fat Loss Tips Womens
Women Natural Beauty Secret: नितळ त्वचा अन् चेहऱ्यावर चमक; 'या' वस्तूंचा वापर करून प्राचीन काळातील महिला दिसायच्या सुंदर!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com