Gita Updesh saam tv
लाईफस्टाईल

Gita Updesh: व्यक्तीला नर्कात घेऊन जातात 'या' गोष्टी; भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली नरकाची ३ दारं

Bhagavad Gita three gates of hell: भगवद्गीता आज जगभरात प्रसिद्ध झाली आहे. जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी लोक त्याचे ज्ञान आत्मसात करतात. भगवद्गीतेत आपल्याला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेल्या ज्ञानाचं वर्णन आढळतं.

Surabhi Jayashree Jagdish

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक एक ग्रंथ आहे. ज्यामध्ये निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगितलंय. भगवान श्रीकृष्णाने गीतेत असे तीन दरवाजांबाबत माहिती दिलीये, जे मानवाच्या विनाशाचे कारण बनू शकतात. गीतेत वर्णन केलेल्या या श्लोकाद्वारे जाणून घेऊया की, कोणत्या गोष्टी माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकतात. गीतेच्या १६ व्या अध्यायातील २१ व्या श्लोकात त्याचं वर्णन आढळून येतं.

कोणतंही काम नि:स्वार्थाने करा

गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं होतं की, माणसाने कोणतंही काम निःस्वार्थपणे केलं पाहिजे. याचा अर्थ असा की, तुम्ही कोणतंही काम फळाची अपेक्षा न करता केलं पाहिजे. यामध्ये जर तुम्ही ही गोष्ट तुमच्या आयुष्यात अंमलात आणली तर तुमच्या आयुष्यात दुःखाला जागा राहणार नाही. तुम्ही आयुष्यभर सुखी राहू शकता.

श्लोक-

त्रिविधं नकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।

काय आहे या श्कोलाचा अर्थ?

गीतेच्या या श्लोकामध्ये त्या तीन गोष्टींचे वर्णन केलंय. यामध्ये माणसाला नरकाच्या दारात घेऊन जाणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे - काम म्हणजे भौतिक इच्छा, क्रोध आणि लोभ.

या गोष्टी कशा बनतात विनाशाचं कारण?

काम

एखाद्या व्यक्तीच्या मनातील काम म्हणजेच त्याच्या भौतिक इच्छा त्याच्या आत्म-साक्षात्कारात अडथळा ठरू शकतात. यामुळे व्यक्तीला पापकर्म करण्यास भाग पाडलं जातं. तुमच्या भौतिक इच्छा जितक्या जास्त असतील तितक्या त्या तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्यास भाग पाडतील. या इच्छा एखाद्या व्यक्तीला फसवणूक, खोटं बोलणं, चोरी करणं आणि इतर चुकीची कृत्यं करण्यास प्रवृत्त करू शकतात.

राग

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असून रागाच्या भरात कधीही कोणताही निर्णय घेऊ नये. कारण रागाच्या भरात माणूस अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा रागाच्या भरात केलेलं काम भविष्यात तुमचं नुकसान करू शकतं.

लोभ

माणसाच्या विनाशात लोभाची महत्त्वाची भूमिका असते. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, माणसाकडे जितकं जास्त असतं तितका त्याचा लोभ वाढत जातो. माणसाचा वाढता लोभ त्याला अधर्माचा मार्ग निवडण्यास भाग पाडतो. परिणामी लोभ देखील माणसाला नरकात नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

डिसक्लेमर- या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधानं केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना आम्ही समर्थन देत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT