Loose Motion google
लाईफस्टाईल

Loose Motion थांबवण्यासाठी करा 'हे' ५ घरगुती उपाय

Home Remedies For Loose Motion: लूज मोशनमुळे शरीरात पाण्याच्या कमतरतेसह अशक्तपणा येत असतो. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करावेत, नाहीतर गंभीर समस्या उद्भवण्याची शकता असते. अनेक घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लूज मोशनपासून आराम मिळवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय:

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक वेळा डायरियाची समस्या म्हणजेच लूज मोशन उद्भवत असते. त्यामुळे वारंवार शौचाला जावे लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता देखील होत असते. सतत लूज मोशनमुळेही अशक्तपणा जाणवतो. दरम्यान लूज मोशनचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे तीव्र अतिसार जे १ किंवा २ दिवस टिकत असतो.(Latest News)

तर दुसरा क्रॉनिक डायरिया, जे १ किंवा २ नाही तर अनेक दिवस टिकत असतो. दोन्ही प्रकरणांमध्ये योग्य उपचार आवश्यक आहेत. यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतली जातात, पण लवकर आराम मिळत नाही. काही घरगुती उपायांनी या समस्येत खूप आराम मिळेल.

बाभळीची पाने काळ्या जिऱ्यासोबत खाल्ल्याने लूज मोशन थांबतात. या झाडाच्या सालापासून बनवलेला काढा प्यायल्याने देखील या त्रासापासून आराम मिळतो.

हळद

हळदीतील प्रतिजैविक गुणधर्म बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. लूज मोशनच्या बाबतीत अर्धा चमचा हळद पावडर एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. हे दिवसातून २ किंवा ३ वेळा प्या.

सफरचंद व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर लूज मोशन थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा. त्यात थोडे मध घालून ढवळून दिवसातून ३ किंवा ४ वेळा प्या.

दालचीनी

दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरस गुणधर्म असतात. यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळत असतो. १ चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा ताजे किसलेले आले एका ग्लास उकळत्या पाण्यात घाला आणि मिक्स करा. त्यानंतर ते ३० मिनिटे ठेवा आणि ते पाणी दिवसातून २ किंवा ३ वेळा प्या.

मूग डाळ खिचडी

जर कोणाला लूज मोशन आले तर डाळीची खिचडी खावावी. यामुळे लूज मोशनपासून आराम मिळतो. कारण लूज मोशन असताना साधं अन्न खाल्लं तरी बरं वाटत नाही. त्यामुळे मूग डाळ आणि तांदळाच्या खिचडीसोबत दही किंवा ताक प्यायल्यानेही आराम मिळत असतो.

गाजर सूप

लूज मोशनपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे सूप सेवन करू शकता, यामध्ये तुम्ही गाजराचे सूप पिऊ शकता. तुमचे पचन योग्य मार्गावर येण्यासाठी दिवसातून १ किंवा २ वेळा गरम गाजर सूप प्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT