Sakshi Sunil Jadhav
आपलेच लोक आपल्या कामाला येतील.जवळच्या व्यक्तीच्या मदतीने कामे पूर्ण होतील. दिवस चांगला आहे.
सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हाल. राजकारणामध्ये उत्तम सल्ला आज आपण एखाद्याला देऊ शकाल.
विष्णू उपासना आज चांगली ठरणार आहे. महत्त्वाच्या बैठका पार पडतील. चांगल्या वार्ता कानावर येतील.
ठरवून अडचणी कोणी उत्पन्न करत नसतो. पण आलेल्या गोष्टी भोगाव्या लागतात. आपले मनोबल उत्तम ठेवणे गरजेचे आहे.
जोडीदाराला समजून घेताना आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मनाला मुरड घालून दिवस कंठावा लागेल.
पोटाच्या तक्रारींनी सध्या त्रस्त आहात. आज सुद्धा काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळावे.
संतती मधील कला गुण बहरतील.एखाद्या गोष्टीने प्रेरित होऊन जाल. स्वतः मधील सृजनशीलता वाढेल.
बैठ्या घराचे स्वप्न असेल तर आज पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकाल. शेतीवाडीच्या कामांमध्ये यश मिळणार आहे.
आपली रास धाडसी आणि साहसी आहे. आज त्याच्यामध्ये अधिक भर पडेल. पराक्रमात भर पडेल. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
नवी ऊर्जा घेऊन आज कामे करावी लागतील. घरी पाहुण्यांची उठबस असेल. स्नेहभोजनाचे योग येतील.
आपण आपल्याला एक वेगळ्या प्रकारे गवसाल. आपली उर्मी, जिद्द, ताकद दाट होईल. स्वतःलाच प्रेमाने गोंजाराल . इतरांना आपल्या प्रभावामुळे आश्चर्यचकित कराल. दिवस चांगला आहे.
नको असलेल्या गोष्टी आज अंगलट येतील. यातून पळवाट काढावी की काय असं वाटेल. पण परिस्थितीशी दोन हात करा.