लग्नासाठी Matrimonial साइटवर स्थळं शोधताय? प्रोफाइल खरी की खोटी कशी चेक कराल, जाणून घ्या Saam TV
लाईफस्टाईल

लग्नासाठी Matrimonial साइटवर स्थळं शोधताय? प्रोफाइल खरी की खोटी कशी चेक कराल, जाणून घ्या

आजच्या या डिजिटल युगात, Matrimonial Site वरती स्थळं शोधणं खूप कठीण होत आहे. कारण इंटरनेटच्या या युगात फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा साइटवर योग्य प्रोफाइल ओळखणे देखील कठीण होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजच्या या डिजिटल युगात, मॅट्रिमोनिअल साइटवरती (Matrimonial Site) स्थळं शोधणं देखील खूप कठीण होत आहे. कारण इंटरनेटच्या या युगात फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा साइटवर योग्य प्रोफाइल ओळखणे देखील कठीण होत आहे. अशा परिस्थितीत कोणती प्रोफाईल खरी आहे हे चेक करणं अवघड असंत. कारण काही लोक एखाद्या व्यक्तीची खोटी प्रोफाइल (Profile) तयार करून किंवा काही माहिती लपवून फसविण्याचा प्रयत्न करतात. तसंच काही वेळा पैशांचीही मागणीही करतात. अशा परिस्थितीत एखादं स्थळं शोधताना समोरच्या व्यक्तीच्या प्रोफाइलची खरी खोटी माहिती तपासण्याचे काही पर्याय खालीलप्रणाणे आहेत.

फोटो -

प्रत्येक व्यक्तीचा फोटो खूप काही सांगून जातो. त्यामुळे कोणत्याही साइटवर प्रोफाइल तयार करण्यापूर्वी, आपण स्वत: आपल्या फोटोसह समोरच्या फोटोबाबत व्यवस्थित आणि योग्य प्रकारे काळजी घ्यायला हवी. आणि फोटो नसलेल्या कोणत्याही आयडीला शॉर्टलिस्ट करू नका. तसंच फोटोवरुनच योग्य वयाचा अंदाजही तुम्ही लावू शकता. त्यामुळे सर्वात पहिलं फोटोच्या बाबतीत सतर्क रहा.

माहिती -

कोणत्याही मॅट्रिमोनिअल साइटवर ID बनवण्याआधी प्रत्येकाला काही महत्वाची आणि मूलभूत माहिती द्यावी लागते, मात्र जर ही मूलभूत माहिती एखाद्याच्या प्रोफाइलवर आढळलीच नाही तर अशा लोकांपासून सावध रहा. तसंच जे वारंवार प्रोफाइल वरील माहिती बदलत असतील ते बदल लक्षात आले तर ते देखील फेक लोकं आहेत समजून जा आणि त्यांच्यापासून सावध रहा जसं की पटकन फोटो बदलणे, आवडीचे कलाकार बदलणे, अशा लोकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण अशा लोकांच्या प्रोफाईलमध्ये ज्यादा प्रामाणिकता नसते.

पैशांची मागणी -

मॅट्रिमोनिअल साइटवरून तुम्हाला कोणीही प्रोफाईलद्वारे पैसे मागितले तर सावधान. कारण अनेकांनी मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे (WebSite) इतर लोकांची ऑनलाइन फसवणूक केली आहे, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने मॅट्रिमोनियल साइटद्वारे तुमच्याकडे पैसे मागितले तर त्याच्यापासून दूर राहा.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT