Makeup For Navratri Saam TV
लाईफस्टाईल

Makeup For Navratri : नवरात्रीत सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील; 'या' पद्धतीने करा मेकअप

Ruchika Jadhav

नवरात्र उत्सव आजपासून सुरु झाला आहे. नवरात्र म्हटलं की घरोघरी घटस्थापना आणि रात्री गरबा नृत्य असं समिकरण ठरलेलं आहे. मुंबईमध्ये तर रात्री अगदी ११ ते १२ वाजेपर्यंत गरबा खेळला जातो. गरबा खेळताना आपल्याला बराच घाम येतो. अशात मुली मेकअप करतात तेव्हा घाम आल्याने मेकअप मेल्ट सुद्धा होतो आणि चेहरा खराब दिसू लागतो.

गरबा पूर्ण एनर्जीने आणि जल्लोषात खेळतात. त्यामुळे काहीवेळा मुलींच्या चेहऱ्यावरील पावडर फटते किंवा मग डोळ्यांना अपल्याय केलेलं ग्लिटर खराब दिसू लागतं. सतत चेहरा पुसल्याने मेकअप आणखी जास्त खराब होतो. अता असे प्रसंग तुमच्याबरोबर सुद्धा अनेकवेळा घडल्या असतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गरबा खेळण्यासाठी जाण्याआधी कशा पद्धतीने मेकअप केला पाहिजे याची माहिती सांगणार आहोत.

पहिली स्टेप

चेहऱ्यावर मेकअप छान सेट व्हावा यासाठी मेकअप करण्याआधी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसेच नंतर पूर्ण स्किन कोरडी करून घ्या.

त्यानंतर चेहऱ्यावर मॉश्चराईजर अप्लाय करा. चेहऱ्यावर मॉश्चराईजर लावल्याने तुमची स्किन मऊ होते. त्यानंतर चेहऱ्यावर कन्सीलर अप्लाय करा. कन्सीलर फाउंडेशन धरून ठेवण्याचे काम करते. त्यामुळे चेहऱ्यावर कन्सीलर नक्की अप्लाय करा.

तसेच नंतर तुम्ही फाउंडेशन लावण्याऐवजी चेहऱ्यावर बीबी क्रिम सुद्धा लावू शकता. गरबा खेळताना आपल्याला घाम येतो. त्यामुळे चेहऱ्यावर शेटवी पातळ टेक्सचर असलेलं फाउंडेशन किंवा अन्य क्रिम अपल्याय करा. बहुतेक मुलींना फाउंडेशनपेक्षा बीबी क्रिम फार सुट करते.

क्रिम अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर बनाना पावडर लावून घ्या. अशा पद्धतीने मेकअप केल्यास कितीही घाम आला तरी मेकअप मेल्ट होत नाही. तसेच डोळ्यांना काजळ लावण्याऐवजी फक्त लायनर लावा. यानेही लूक सु्ंदर दिसतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार: राहुल गांधी

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टनीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Maval News: 'प्रत्येकजण मरायला आलाय..' सुनिल शेळके विरोधकांवर संतापले, अजित पवारांनी कान टोचले; मावळात हायहोल्टेज ड्रामा!

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

Arbaz- Nikki: बाईsss काय हा प्रकार!, अरबाजने निक्कीला चक्क उचलून घेतलं

SCROLL FOR NEXT