Liver Health
Liver Health Saam Tv
लाईफस्टाईल

Liver Health : यकृताचे आरोग्य जपायचे आहे ? या पदार्थांचे आहारात सेवन करा

कोमल दामुद्रे
Liver Health

यकृत हे आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. ते शरीरातील रसायनांचे नियमन करुन अन्नाचे पचन करते. तसेच शरीरातील कचरा वाहून नेण्यासाठी पित्त तयार करते. त्याचे आरोग्य राखण्यासाठी आपण आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे जाणून घ्या

Beetroot

बीट हे आपल्या यकृतासाठी सगळ्यात चांगला पदार्थ आहे. यात फायबर, फोलेट (व्हिटॅमिन बी9), मॅंगनीज, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्व (Vitamins) क यांचा उत्तम स्रोत आहे. बीटरूटचा रस यकृताला जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करतो. आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता वाढवते.

Green Tea

संध्याकाळी 4-5 च्या सुमारास 1 कप ग्रीन टी पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. एका जपानी अभ्यासानुसार, दररोज 10 कप ग्रीन टी पिण्याने यकृताचे आरोग्य सुधारू शकते.

Olive Oil

ऑलिव्ह ऑईल हे सलादमध्ये वापरले जाते. ऑलिव्ह ऑइल यकृतातील चरबी कमी करू शकते आणि रक्त प्रवाह देखील सुधारू शकते.

Milk Thistle

दूध थिस्सल ही एक फुलांची औषधी वनस्पती आहे जी यकृताचे विकार आणि पित्ताशयाच्या समस्या बरे करण्यासाठी लोकप्रिय आहे.

Cruciferous vegetables

यकृताचे कार्य आणि यकृताच्या एन्झाईम्सची पातळी सुधारण्यासाठी तुमच्या जेवणात ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी या भाज्या घाला.

Walnut

सकाळी 1 भिजवलेले अक्रोड यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) ठरेल. अक्रोडमध्ये असलेले फॅटी लिव्हर इतर अनेक आजार कमी करण्यास मदत करते

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT