Cough Syrup : भारतीय औषधी कंपनीने बनवलेले सर्दी-खोकलावर असणारे सिरप वापरु नका, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. नुकतेच याचे सेवन केल्याने गांबियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू (Death) झाल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.
या घडलेल्या घटनेनंतर तज्ज्ञांनी हे कफ सिरप पिण्यास मनाई केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, घरांमध्ये लहान मुलांना (Child) खोकला किंवा ताप आल्यावर पालक त्यांना कफ सिरप देतात. काही वेळा याचा डोस खूप जास्त होतो, त्यामुळे मुलांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. (Latest Marathi News)
याविषयी बालरोगतज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.
बालरोगतज्ज्ञ डॉ.अरुण शहा यांनी सांगितले की, मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ-सिरप देऊ नये. या मुलांना कफ सिरप दिल्याने शरीराला मोठी हानी होते. जर मुलं खोकल्यामुळे झोपू शकत नसतील तरच 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सिरप द्यावे.
डॉक्टर शाह सांगतात की, लहान मुलांचा खोकला आणि सर्दी स्वतःच बरी होते. पण लोकांना असे वाटते की, औषध किंवा सिरप दिल्याने मुलाला आराम मिळेल, परंतु तसे नाही. चुकूनही त्याचा ओव्हरडोस झाला तर त्याचे अनेक तोटे होतात. अशा परिस्थितीत, पालकांनी सामान्य खोकला किंवा तापामध्ये अजिबात सिरप न देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सिरप फक्त गंभीर प्रकरणांमध्ये दिले जाते
डॉ. शहा यांनी सांगितले की, मुलांना ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे गंभीर संसर्ग झाल्यासच त्यांना कफ सिरप दिले जाते. सामान्य ताप आणि सर्दीमध्ये सिरप अजिबात देऊ नये. कफ सिरपचा घातक परिणाम लक्षात घेऊन सरकारने अनेक कफ सिरपवर बंदी घातली आहे. डॉ शाह सांगतात की, अनेक डॉक्टर मुलांना कोरेक्स सारखी औषधे लिहून देतात, ज्यामुळे खूप नुकसान होऊ शकते.
डॉ शहा यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये खोकला आणि सर्दी हा सामान्य विषाणू आहे. बऱ्याचदा, खोकला किंवा ताप हे चांगले लक्षण आहे. चार-पाच दिवस ताप उतरत नसेल, मुलाचे पोट फुगले असेल किंवा लघवी येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सुचवले तरच हे सिरप मुलाला द्यावे.
कोणत्याही औषधाचा ओव्हरडोज घातक ठरू शकतो
वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजीत सिंग म्हणतात की, गॅम्बियामध्ये मुलांच्या मृत्यूचे एक कारण औषधाचा ओव्हरडोस असू शकते. त्याचबरोबर हे औषध कोठे बनवले जाते, त्यात चुकून काही घातक पदार्थ सापडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या औषधाच्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण माहिती समजेल, मात्र अशावेळी कोणतेही औषध किंवा सिरपचा ओव्हरडोज देखील घेऊ नये.
उदाहरणार्थ, जर तुम्ही पॅरासिटामॉल सारखे औषध दिवसातून तीन वेळा घेतले तर त्याचा मूत्रपिंडावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, हे महत्वाचे आहे की जर सौम्य संसर्ग, ताप किंवा सर्दी असेल तर सिरप कधीही घेऊ नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.