Liver Cancer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर असणाऱ्यांना जाणवतात 'ही' प्रमुख लक्षणं; वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Cancer Awareness: लिव्हर कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला साधी वाटतात, पण उजव्या बाजूला होणारी वेदना, वजन कमी होणे, कावीळ, थकवा यांसारखी संकेत गंभीर असू शकतात. वेळीच तपासणी करणे अत्यंत आवश्यक.

Sakshi Sunil Jadhav

पोटाच्या उजव्या वरच्या भागातील वेदना हे लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

वजन कमी होणे, कावीळ आणि मळमळ यांसारखी लक्षणे गंभीर संकेत देतात.

चुकीची जीवनशैली, धूम्रपान, दारू आणि फॅटी लिव्हरमुळे धोका वाढतो.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या, खाण्यापिण्याच्या, कामाच्या वेळा यात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामध्ये अनेकजण व्यायाम करायला मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करतात. मग कामाच्या वाढत्या धावपळीमुळे होणाऱ्या वेदनांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र हे लिव्हर कॅन्सरचे लक्षण असू शकते. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

लिव्हर कॅन्सरमध्ये सुद्धा काही भागात सुरुवातीला वेदना जाणवतात. त्यामध्ये पोटात दुखेणे, थकवा, कंबरदुखी अशा सामान्य लक्षणांचा समावेश असतो. तज्ज्ञ डॉ. जय चोक्षी यांच्या माहितीनुसार, जर पोटाच्या उजव्या बाजूला दुखत असत असेल तर ते लिव्हर कॅन्सरचे लक्षण असू शकते. यामध्ये रुग्णाच्या पोटाच्या वरच्या बाजूला वेदना वाढायला सुरुवात होते. ही वेदना सुरुवातीला फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे हे लक्षण ओळखणं बऱ्याचदा कठी होतं.

लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे

सतत कंबरदुखी

अचानक वजन कमी होणे

भूक कमी होणे

काविळीचा त्रास वाढणे

वारंवार मळमळ किंवा उलट्या होणे

पोट फुगणे

लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

सतत अल्कोहोल दारू यांसारख्या पदार्थांचे सेवन

हॅपिटीट्स बी आणि सी विषाणुंचा संसर्ग

फॅटी लिव्हरच्या समस्या

लठ्ठपणा आणि असंतुलित आहार

धुम्रपान आणि चूकीची जीवनशैली

स्मोकींग आणि जंक फूडचा आहार

काय काळजी घ्यावी?

धुम्रपान करणं जमेल तितकं टाळा.

संतुलित आणि निरोगी आहार घ्या.

काही समस्या खूप दिवस जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.

पौष्टीक पदार्थ खात राहा. तसेच योग्य प्रमाणात वजन नियंत्रणात ठेऊन खात राहा. काही सांधीदुखीच्या समस्या दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर त्वरित उपचार करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ट्विस्ट! गुलाल उधळला पण निकाल कोर्टात, सोलापूरनंतर धुळ्यातील विजयाने भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये ताराच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका

Men's Day: 'होय पुरूषही रडतात...', बोरिवली स्टेशनवर ढसाढसा रडणारा तो तरुण कोण? VIDEO ची होतेय चर्चा

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT