Sakshi Sunil Jadhav
आजकाल आरोग्याबद्दल जागरूक असणारे लोक पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस खाण्याकडे जास्त कल दाखवत आहेत. पौष्टिक मूल्य, फायबर आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे ब्राउन राईस शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.
ब्राउन राईसमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टळते.
उन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीज असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
यामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते.
फायबरयुक्त असल्याने ब्राउन राईस पचन सुधारतो आणि कब्जाचा त्रास कमी होतो.
ब्राउन राईसमध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, बी-व्हिटॅमिन्स सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक घटकांपासून संरक्षण करतात.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे शरीरात फॅट जमा होत नाही. ब्राउन राईसमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे घट्ट आणि निरोगी ठेवतात.
नैसर्गिक पोषक घटक त्वचा चमकदार आणि केस मजबूत होण्यास मदत करतात.