Blood disorder, Health issue  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : रक्त विकाराचा आजार कशामुळे होतो ? अशक्तपणामुळे की, आणखी कोणत्या समस्येमुळे जाणून घ्या

रक्तविकार कसा होतो ? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

बदलेली जीवनशैली, ताणतणाव व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अशक्तपणा येतो. आजकाल या समस्येला आपल्या प्रत्येकाला तोंड द्यावे लागते.

हे देखील पहा -

मानवी शरीरात रक्ताच्या कमतरतेला रक्त विकार म्हणतात. सामान्यतः रक्त विकाराची समस्या एखाद्या संसर्गामुळे, औषधाचे दुष्परिणाम किंवा लोह, व्हिटॅमिन (Vitamins) के, व्हिटॅमिन बी 12 सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते. शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांचा, पोषणमूल्यांचा अभाव, पाण्याची कमतरता अशा अनेक कारणांमुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. यावर आपल्याला अनेक प्रकारचे औषध घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशक्तरपणा का व कसा येतो ? रक्ताची कमतरता की, आणखी नवा आजार (Disease) या विषयी जाणून घेऊया.

रक्तविकार काय आहे ?

व्हेरीवेल हेल्थच्या मते, आपल्या शरीरातील अस्थिमज्जा हाडांमधील एक फॅटी क्षेत्र आहे जो नवीन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स तयार करतो. जेव्हा यापैकी कोणत्याही पेशींमध्ये समस्या उद्भवते किंवा प्लाझ्मामध्ये रक्त गोठणे सुरू होते, तेव्हा शरीरात रक्त विकाराची समस्या सुरू होते.

लक्षणे -

त्वचा पांढरी किंवा पिवळी पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे आणि अंगदुखी ही रक्ताच्या विकाराची लक्षणे असू शकतात. हे रक्त किंवा अस्थिमज्जाच्या समस्येमुळे होते. अशक्तपणा, रक्तस्त्राव विकार, हिमोफिलिया आणि रक्ताच्या गुठळ्या हे रक्त विकारांचे सामान्य प्रकार आहेत. मानवी शरीरात रक्ताच्या कमतरतेला रक्त विकार म्हणतात. विकाराची समस्या एखाद्या संसर्गामुळे, विषारी पदार्थ, औषधांचे दुष्परिणाम किंवा लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 12 सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते. तसेच हा आजार नुवांशिक देखील असू शकतो.

रक्तविकाराची कारणे -

१. शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्यावर अशक्तपणा येणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा हृदय गती वाढणे ही यांसारखी सामान्य लक्षणे दिसून येतात.

२. थ्रोम्बोसाइटोपेनिया हा रोग प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे होतो. तोंड आणि नाकातून रक्तस्त्राव होतो.

३. हिमोफिलिया खराब होणे किंवा गोठणे हे मुख्य कारण आहे, ज्यामुळे रक्तस्त्राव वाढतो. स्नायू आणि सांधेदुखी ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT