Skin care tips : स्वयंपाकघरातील हे पदार्थ आहेत चेहऱ्यासाठी वरदान !

स्वयंपाकघरातील कोणता पदार्थ चेहऱ्याची चमक टिकवतो.
Health tips, Skin care tips
Health tips, Skin care tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाल्याचा वापर केला जातो. मसाल्यांबरोबरच इतरही काही पदार्थ आहेत, जे चेहऱ्यावर तसेच खाण्यासाठी वापरता येतात.

हे देखील पहा -

आपल्याला स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या त्वचेची सुंदरता वाढू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर आपण करत असतो. काही महागड्या उत्पादनांचा वापर करुन आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचते. आज आपण असे काही स्वयंपाकघरातील पदार्थ पाहणार आहोत ज्यामुळे आपला त्वचेचा रंग उजळेल.

१. आयुर्वेदात हळदीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे त्याचा वापर सौंदर्यप्रसाधनासाठी महत्त्वाचा ठरतो. हळद त्वचेतील जळजळ कमी करते तसेच त्वचा मुलायम बनते. हळदीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि चमक येतो. त्वचेवर हळद वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो.

२. टॅन दूर करण्यासाठी दह्यात चिमूटभर हळद मिसळून रोज चेहऱ्याला लावा. काही मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. असे केल्याने त्वचा चमकदार होईल.

Health tips, Skin care tips
Health tips : मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर किंवा त्वचेच्या इतर भागावर मुरुमे येतात ? जाणून घ्या त्यामागचे तथ्य

३. बेसनाच्या पिठात दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा. आठवड्यातून तीनदा हात आणि पायांवर लावा. अर्ध्या तासानंतर ते धुवा.

३. चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी हळद पावडर आणि दुधाची (Milk) पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर असणारे केस कमी होतील.

४. स्ट्रेच मार्क्सचे मार्क्स कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल (Oil) लावून मसाज करा. त्यानंतर बेसन, दही आणि हळद एकत्र करून त्या जागेवर लावा. अर्ध्या तासानंतर ते धुवा. तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील.

५. उटणं बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, बदाम, दही आणि हळद एकत्र करून घ्या. सर्वात आधी तिळाच्या तेलाने शरीराला मसाज करा. नंतर ही पेस्ट लावा. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तासा आधी ते धुवा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com