5 THINGS YOU SHOULD NEVER SHARE EVEN WITH YOUR CLOSEST FRIENDS  saam tv
लाईफस्टाईल

जिवलग जिवाच्या मित्रालाही सांगू नका तुमच्या आयुष्याच्या या ५ गोष्टी, अन्यथा डोक्याला मारावा लागेल हाथ

things to hide from friends : प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा खास मित्र असतो, ज्याच्याशी आपण सुख-दुःख वाटून घेतो. मैत्री कितीही घट्ट असली, तरी काही वैयक्तिक आणि खाजगी गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे केव्हाही उत्तम ठरते.

Saam Tv

प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा खास मित्र किंवा मैत्रीण असते, ज्याला आपण आपला 'बेस्ट फ्रेंड' मानतो. लहानपणीच्या खोड्यांपासून ते आवडी-निवडीपर्यंत अनेक गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो. मात्र, दोस्ती कितीही घट्ट असली, तरी काही वैयक्तिक गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे फायद्याचे ठरते. अन्यथा, भविष्यात मानसिक त्रासाला किंवा पश्चातापाला सामोरे जावे लागू शकते.

आर्थिक स्थिती आणि बँक बॅलन्स

दोस्तीमध्ये पैशाचा विषय आल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे, तुमची बचत किती आहे आणि भविष्यातील आर्थिक नियोजन काय आहे, या गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात.

जोडीदारासोबतची प्रायव्हेट लाईफ

तुमचे वैवाहिक जीवन किंवा नात्यातील वैयक्तिक गोष्टी अत्यंत खाजगी असतात.जोडीदाराची कोणतीही कमकुवत बाजू मित्रांना सांगितल्याने लोकांच्या नजरेत तुमच्या पार्टनरचा मान कमी होऊ शकतो.

कुटुंबातील वाद

कुटुंबातील वाद वेळोवेळी स्वतःहून सुटतात. पण घरची भांडणे किंवा जमिनीचे वाद मित्रांना सांगितल्यास त्यांच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दलची प्रतिमा कायमची खराब होऊ शकते.

पूर्ण न झालेली स्वप्ने आणि भविष्यातील योजना

कोणतीही मोठी योजना किंवा महत्त्वाचा निर्णय पूर्ण होईपर्यंत त्याची वाच्यता करू नका. असे केल्याने लोकांकडून सारखे प्रश्न विचारले जातात आणि काम पूर्ण न झाल्यास अनावश्यक मानसिक ताण येतो.

तुमच्या स्वतःच्या असुरक्षितता आणि भीती

आयुष्यात प्रत्येकावर असा वेळ येतो जेव्हा आत्मविश्वास कमी होतो. पण स्वतःच्या सर्व कमकुवत बाजू किंवा भीती मित्रांसमोर वारंवार मांडणे महागात पडू शकते. भविष्यात नाते बदलल्यास या गोष्टी तुमच्या विरोधातही वापरल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्हा बँकेचा उद्या फैसला! विखे-थोरात विरुद्ध लंके गटाच्या प्रतिष्ठेची लढाई

छत्तीसगड ते बीड ड्रग्ज कनेक्शन! गडचिरोलीत १.४६ कोटींचा अंमली पदार्थ जप्त

काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र; लोकशाही बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Tuesday Horoscope: पैशांची तंगी जाणवणार नाही; या 3 राशींना मिळणार लाभ, वाचा राशीभविष्य

Anarkali Dresses For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी खास अनारकली सूट, लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT