पायातील वेदना, सूज आणि लालसरपणा ही पॅनक्रियाटीक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
डीप वेन थ्रॉम्बोसिस ही रक्त गोठण्याची जीवघेणी स्थिती आहे.
लवकर निदान झाल्यास उपचार शक्य आहेत, त्यामुळे लक्षणे दुर्लक्ष करू नका.
मेडीकल एक्सपर्ट्सनी केलेल्या संशोधनात कॅन्सरची काही वेगळी लक्षणे आढळली आहेत. कॅन्सरची लक्षणे ही शरीराच्या भागात दिसतात हे आपल्याला माहित आहे. मात्र यामध्ये पायांचाही समावेश होतो. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे तुमच्या पायांमध्ये जाणवतात. पण कशी जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
पायातील काही बदल किंवा वेदना या जीवघेण्या Pancreatic Cancerचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यांनी प्रदर्शित केलेल्या माहितीनुसार Pancreatic च्या कॅन्सरचा आजार मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी पाचवा आहे. या कर्करोगामुळे शरीरात डीप वेन थ्रॉम्बोसिस नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या आजारात रक्त गोठून मोठ्या रक्त वाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात. ही समस्या बऱ्याच वेळेस पायात दिसून येते.
पॅनक्रियाटीक कॅन्सर असल्याचे पहिले लक्षण म्हणजे पायात निर्माण झालेली गाठ असते. यालाच डीप वेन थ्रॉम्बोसिस किंवा DVT म्हणतात. याची मुख्य चार लक्षणे म्हणजे पायात वेदना, सूज येणे, लालसरपणा आणि उष्णता जाणवणे.
कधी कधी या रक्ताच्या गाठींचा काही भाग तुटून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो किंवा छातीत वेदना निर्माण होतात. त्याने अत्यंत गंभीर आणि जीवघेणी समस्या होऊ शकते. हा कॅन्सर metastatic कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
पॅनक्रियाटीक कॅन्सर मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे:
1.डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर किंवा त्वचेवर पिवळसरपणा (जॉन्डिस) दिसणे.
2.त्वचेला सतत खाज सुटणे.
3.लघवीचा रंग गडद होणे.
4. मल पांढरट होणे.
5. भूक कमी किंवा अचानक वजन कमी होणे.
6. थकवा, अंगावर ताप येणे, तसेच पोटात आणि पाठीच्या वरच्या भागात वेदना जाणवणे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.