How to recycle old items in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जाणून घ्या, जुन्या वस्तू फेकून देताना त्यांच्या पुनर्वापराच्या पद्धती

घरातील निरुपयोगी वस्तूंचा असा करा वापर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : घराची साफसफाई (Cleaning) करताना बऱ्याचदा आपण जुन्या वस्तू फेकून देतो आणि त्या जागी नवीन वस्तू आणतो. अनेकदा आपण गोष्टी जुन्या समजून फेकून देतो. या वस्तूंचा घरात काहीही उपयोग होत नाही आणि त्या अनावश्यकपणे घरात जमा होतात. पण त्या जुन्या, निरुपयोगी वाटणाऱ्या वस्तूंचा नवीन पद्धतीने आपण वापर करू शकतो. थोडा विचार करून आपण त्या वस्तूंना क्रिएटिव्ह बनवू शकतो आणि घरातील त्याचा उपयोग करू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरात पडलेल्या कोणत्या गोष्टी नवीन पद्धतीने वापरता येतील.

हे देखील पहा -

घरात पडलेल्या निरुपयोगी वस्तूंचा असा वापर करा.

१. अंड्याच्या डब्यात अंडी विकत घेतली असतील तर तो पुठ्ठा फेकून न देता त्याचा वापर करुन आपल्याला डास आणि किडे दूर करता येतील. एवढेच नाही तर त्यावर पेंटिंग करून आपण सुंदर वॉल हँगिंग देखील बनवू शकतो. तसेच त्याच्या मदतीने पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यासाठी जागा बनवू शकतो आणि आपण ते ओले करून लागवड करताना देखील वापरू शकतो.

२. घरातील फ्यूज झालेला बल्बचा वापर करुन तेलाचे सुंदर दिवे, हँगिंग प्लांटर्स इत्यादी बनवू शकतो. तसेच या बल्बमध्ये दिवाळीचे छोटे दिवे लावून तुम्ही डेकोरेटरही करु शकता. अशा प्रकारे, ते आपल्या घराच्या सौंदर्यात भर घालू शकते.

३. आपल्या घरात दर काही दिवसांनी प्लास्टिकच्या बाटल्या जमा होतात ज्या आपण फेकून देतो पण त्यापासून सुंदर ऑर्गनायझर किंवा डेकोरेटर बनवू शकतो, तर घरातील इतर छोट्या-मोठ्या गोष्टी आपण अगदी सहज ठेवण्यास मदत होईल.

४. दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलत असाल तर ते फेकून देण्याऐवजी घरात क्लिनर म्हणून वापरू शकता. घराच्या स्वच्छतेसाठी या टूथब्रशचा खूप उपयोग होऊ शकतो. विशेषत: कीबोर्ड, दागिने (Gold), सिंक, बेसिन आदी गोष्टींसाठी होईल.

५. आपण वर्तमानपत्रांना (Newspaper) एक दिवसानंतरच जुने समजू लागतो, परंतु आपण ते बऱ्याच गोष्टींसाठी वापरू शकता. स्वयंपाकघरातील शेल्फवर चटईवर तसेच त्याने आरसादेखील स्वच्छ करू शकता आणि पॅकिंगमध्येही ते अगदी सहज वापरू शकता.

अशाप्रकारे घरातील जुन्या वस्तूंचा वापर आपण करू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT