लातूर: संविधानाची शपथ घेत शिक्षक दाम्पत्याचा विवाह संपन्न... दीपक क्षीरसागर
लाईफस्टाईल

लातूर: संविधानाची शपथ घेत शिक्षक दाम्पत्याचा विवाह संपन्न...

लग्नात संविधानाची उद्देशिका वाचन करून करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांनी संविधान भेट देऊन सुखी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: अहमदपूर (Ahmadpur) येथील प्रसाद गार्डन येथे सुशिल वाघमारे व वर्षा शृंगारे या परिवर्तनवादी शिक्षक दाम्पत्याने लग्नात संविधानाची (Constitution of India) उद्देशिका (Preamble) वाचन करून विवाह (Marriage) संपन्न करून जनतेसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संवैधानिक नितीमूल्यांचा अंगीकार करत जीवन जगण्याची शपथ घेतली आहे. संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. यावरच आपले जीवन अवलंबुन आहे, असे समजून या शिक्षक दाम्पत्याने संविधानाच्या नितीमूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला आहे. (Latur: The marriage of the teacher couple who took the oath of the constitution was consummated)

हे देखील पहा -

नव-दाम्पत्यातील वरपिता वाघमारे हे सामाजिक कार्यकर्ते तर वधू लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुतणी आहेत. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे (MP Sudhakar Shrungare) यांनी संविधान भेट देऊन सुखी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी आजी-माजी आमदार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी नवदाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT