Latur : मांजरा नदीवर वाळू माफियांचा धुडगूस!  SaamTvNews
लाईफस्टाईल

Latur : मांजरा नदीवर वाळू माफियांचा धुडगूस!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातूरची दुष्काळी जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांत वाळू माफियांना बंदी असताना अवैधरित्या वाळूची (Sand) चोरी केली जातेय, यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांनी केली आहे. यावर निलंगा तहसीलदार यांनी कारवाई करत दोन बोटी जिलेटीनने उडवल्या तर एक बोट (Boat) आणि एक पोकलेन जप्त करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

लातूर (Latur) जिल्ह्यात मांजरा रेना, तावरजा, मन्याड, तेरणा आदी नद्या असून यात शासनाने कोणत्याही नद्यांवरील वाळू घाटाचे लिलाव केलेले नाहीत. पण सावरी, माने जवळगा शिवारात ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा केला जातोय. मांजरा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक भागात अनेक वाळू माफिया (Sand Mafia) बोटीने वाळू उपसा करत असून ट्रॅक्टर हायवा यांच्या माध्यमातून उपसा होतोय तर वाहने जाता-येता यावी यासाठी दगडांचा वापर करत रस्ते तयार केले आहेत. यावर प्रशासनाचा कसलाही अंकुश नाही यामुळे कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे निलंगा (Nilanga) तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांनी केली आहे.

यात सावरी माने जवळगा शिवारात तीन बोटीच्या द्वारे अवैध वाळू उपसा केला जात होता. या ठिकाणी अचानक धाड टाकली असता वाळू उपसा करणारे व कामगार पळून गेले. त्यामुळे तहसीलदारांनी दोन बोटी जिलेटिनच्या माध्यमातून उडवून नष्ट केल्या व एक बोट जप्त करण्यात आली व त्याचबरोबर वाळू उपशासाठी असलेला पोकलेन सील करण्यात आलेला आहे. निलंगा महसूल प्रशासनाच्या तहसीलदार जतिन रहमान यांच्या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांची धाबे दणाणले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT