WhatsApp Chat Lock
WhatsApp Chat Lock Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Chat Lock Feature: व्हॉट्सअ‍ॅपच नव अपडेट ! आता चॅट ही करता येणार लॉक, कसे कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

कोमल दामुद्रे

WhatsApp New Update : व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगभरातील अनेक लोक हे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. मेटाने तयार केलेल्या इंस्टंट मेसेजिंग व्हॉट्सअ‍ॅप वर सतत नवनवीन अपडेट येत असतात. अशातच आता आपला संवाद साधणे अधिक सुरक्षित करण्यासाठी मेटाने युर्जरसाठी नवीन फीचर्स जोडले आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपकडून आपले चॅट (Chat) अधिक सुरक्षित करता येणार आहे. आता वापरकर्त्यांना सर्वात सुरक्षित अशी सुविधा देण्यात येणार आहे. ज्यामध्ये वापकर्त्यांना पासवर्ड किंवा बायोमेट्रिक प्रमाणिकरण वापरुन विशिष्ट चॅट लॉकचा पर्याय दिला आहे.

हे चॅट लॉक करण्याव्यतिरिक्त चॅट्स वेगळ्या फोल्डरमध्ये साठवले जातील. तसेच ते नोटिफिकेशनमधील नाव आणि मेसेज लॉक ठेवले जाईल. लॉक केलेल्या चॅट ऑथेंटिकेशननंतरच पाहता येतील.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये चॅट लॉक फीचर (Feature) सुरू झाल्याची माहिती दिली. व्हॉट्सअ‍ॅपमधील या फीचर्समुळे तुमचे चॅट अधिक सुरक्षित होतील. तसेच या फीचर्सबद्दल त्यांना अधिक उत्सुकता आहे.

झुकरबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे. चॅट लॉक केल्याने इनबॉक्समधून बाहेर येतो आणि तसेच तो स्वतःच्या फोल्डरच्या मागे ठेवतो, ज्यामध्ये फक्त डिव्हाइस पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकने प्रवेश केला जाऊ शकतो. ते सूचनांमध्ये त्या चॅटची सामग्री देखील आपोआप लपवते.

या फीचरच्या गरजेबाबत मार्कने सांगितले की, ज्यांना वेळोवेळी आपला फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करावा लागतो किंवा ज्या क्षणी तुम्हाला तुमचा फोन (Phone) दुसऱ्या कोणाशी तरी शेअर करावा लागतो, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरेल. अशा वेळी एक मेसेज येतो. चॅट लॉक केल्यास, त्याची गोपनीयता राहील.

1. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध असलेले

  • हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनवर उपलब्ध असेल.

  • आतापर्यंत, वापरकर्ते बायोमेट्रिक्स किंवा पिन कोड वापरून व्हाट्सएप लॉक करू शकत होते

  • परंतु नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना विशिष्ट खाजगी चॅट्सचे संरक्षण करण्यास अनुमती देते.

  • जर तुमचे चॅट कोणीही पाहण्याचा प्रयत्न केला तरीही ते कोणालाही पाहाता येणार नाही.

  • मेटाने सांगितले की, व्हॉट्सअॅपमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भात अनेक फीचर्स आधीच जोडले गेले आहेत.

  • यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, एनक्रिप्टेड चॅट बॅकअप, मेसेज लपवणे, स्क्रीनशॉट ब्लॉक करणे आणि बरेच काही समाविष्ट असेल.

  • नवीन अपडेटसह, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

2. अशाप्रकारे चॅट लॉक करा

  • सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp वरील कोणत्याही चॅटवर टॅप करावे लागेल.

  • यानंतर, चॅट लॉकचा पर्याय उपलब्ध होईल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे फीचर सक्रिय करू शकता.

  • आता लॉक केलेल्या चॅट्स पाहण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांचा इनबॉक्स खाली खेचणे आणि त्यांचा फोन पासवर्ड प्रविष्ट करणे किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण अधिकृत करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother's Day: कामानिमित्त घरापासून लांब आहात? मग 'मदर्स डे'ला अशा पद्धतीने आईला खुश करा

Travelling Tips: विमानातून प्रवास करताना परफ्यूम आणि डिओड्रंट न्यायला बंदी, पण का?

Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

SCROLL FOR NEXT