Gold Silver Price Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Price : लग्नसराईत धक्का ! सोन्याच्या दरात वाढ तर चांदी ७२ हजार पार, तपासा आजचे दर

Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याचे दर पुन्हा वाढलेले पाहायला मिळाले.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : काल सोन्याच्या दरात घसरणं पाहायला मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेल्या पाहायला मिळाली असताना अशातच आज सोन्याचे दर पुन्हा वाढलेले पाहायला मिळाले.

ऐन लग्नसराईत (Wedding) आज पुन्हा सोन्याचे दर वाढल्यामुळे खरेदीदार पुन्हा चिंतेत सापडले आहेत. तर आज १० ग्रॅम सोन्यासाठी व चांदीसाठी किती पैसे जास्तीचे पैसे मोजावे लागणार हे जाणून घेऊया. तसेच सोन्याची (Gold) शुद्धता कशी तपासाल हे देखील पाहूया.

६ ते ८ जूनपर्यंत RBI ची पतधोरण बैठकीत व्याज दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण किंवा वाढ होऊ शकते. जाणून घेऊया आजचा दर

1. सोन्या-चांदीचा आजचा भाव काय ?

मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच आज या भावात वाढ झाली आहे. MCX वर सोन्याच्या भावात १४ रुपयांनी किंचित वाढ झालेली पाहायला मिळत आहे त्यात आज 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 59,862 इतका आहे तर चांदीच्या दरात 71,990 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. जागतिक पातळीवर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

2. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT