Rituals to avoid poverty on Diwali saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Rituals to avoid poverty on Diwali: दीपावलीची रात्र म्हणजेच लक्ष्मी पूजनाची रात्र ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. याच रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते आणि आपल्या भक्तांच्या घरी वास करण्यासाठी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीची रात्री संपूर्ण वर्षातील सर्वात शुभ रात्री मानली जाते. यावेळी श्रद्धा अशी आहे की, या रात्री माता लक्ष्मी घरात वास करतात आणि त्यामुळे संपत्ती, सुख-समृद्धी वाढते. पौराणिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी घर-घरात भ्रमण करतात. ज्या घरात स्वच्छता, प्रकाश आणि श्रद्धा असतो तिथे त्यांचा स्थायी वास होतो. म्हणूनच दिवाळीपूर्वी घराची पवित्र पद्धतीने साफसफाई करण्याची परंपरा आहे.

पण लक्ष्मी पूजनानंतर काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे, अन्यथा घरात लक्ष्मीजीचं वास्तव्य प्रभावित होऊ शकतं

दुसऱ्या दिवशी सकाळी झाडू किंवा कचरा बाहेर टाळा

दिवाळीच्या रात्री घरात केलेली सफाई आणि दीपप्रज्वलन वातावरण पवित्र बनवते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी झाडू मारून कचरा बाहेर टाकणं अशुभ मानलं जातं. असे केल्याने लक्ष्मीजीचा वास बाधित होतो आणि संपत्तीवर परिणाम होतो.

पूजा पूर्ण झाल्यानंतर मूर्ती लगेच हटवू नका

दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी, गणेश आणि इतर देवतांची स्थापना विधिपूर्वक केली जाते. पूजा संपल्यावर मूर्ती लगेच हलवणं अशुभ ठरते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा येण्याचा धोका असतो.

भांडण किंवा नकारात्मक गोष्टी टाळा

दिवाळीनंतर घराचं वातावरण शांत आणि शुभ ठेवणं गरजेचं आहे. राग, तक्रार किंवा नकारात्मक बोलणं घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करते. लक्ष्मीजी फक्त त्या घरात राहतात जिथे आनंद आणि समाधान असतं.

पूजा स्थान अस्त-व्यस्त ठेवू नका

दीप, फुलं किंवा प्रसाद विसरून ठेवणं चुकीचं मानण्यात येतं. पूजा संपल्यावर स्थान स्वच्छ ठेवा आणि भगवानांना पुन्हा प्रणाम करा. यामुळे शुभ परिणाम अधिक काळ टिकतात.

जुने किंवा तुटलेले दिवे फेकू नका

पूजेत वापरलेले दिवे, कलश किंवा सजावटीच्या वस्तू कचऱ्यात टाकू नका. त्यांना एखाद्या पवित्र ठिकाणी, नदीच्या काठावर किंवा झाडाखाली ठेवण्याची परंपरा आहे. यामुळे घरातील पवित्रता टिकते आणि लक्ष्मीजींची कृपा राहते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे हुबळीत आंदोलन

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT