Kojagiri Purnima 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

Chandra Grahan 2023 : ही पौर्णिमा २८ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. परंतु, या दिवशी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे.

कोमल दामुद्रे

Kojagiri Purnima 2023 Date,Tithi And Muhurt :

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. यंदा ही पौर्णिमा २८ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. परंतु, या दिवशी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे.

असे म्हटले जाते की, संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस असा आहे जेव्हा चंद्र त्याच्या सोळा टप्प्यांसह उगवतो. सोळा कलांच्या परिपूर्ण अवतार म्हणून श्रीकृष्णाला ओळखले जाते. तसेच या दिवशी चंद्रदेवाची पूजा केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कोजागरी पौर्णिमा कधी?

  • पौर्णिमा तिथी ही २८ ऑक्टोबरला असून पहाटे ०४.१७ मिनिटांनी सुरु होईल. तर २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०१. ५३ वाजता संपेल.

  • तर ही पौर्णिमा २८ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

2. कोजागिरी पौर्णिमेला खीर अधिक महत्त्वाची का?

शरद पौर्णिमेला चंद्रातून निघणारी किरणे ही अमृत मानली जातात. यामुळे या दिवशी खीर चंद्रप्रकाशात ठेवली जाते, त्यामुळे चंद्राची किरणे त्यावर पडून अमृताचा प्रभाव होतो असे समजेल जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर (Kheer) ठेवून तिचे सेवन केल्याने लक्ष्मी (Lakshmi) देवी प्रसन्न होते असे मानले जाते.

3. पूजा पद्धत

  • पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

  • घरातील मंदिर (Temple) स्वच्छ करुन देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाच्या पूजेची तयारी करावी.

  • पाटावर लाल पिवळे कापड पसरवा. त्यावर देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाची मूर्ती स्थापित करा.

  • देवासमोर तूपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षता, कुंकूचा टिळा लावा

  • फुले, गुलाब आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT