Dasara Rashi Bhavishya 2023 : दसऱ्याला राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार; मिळेल मनासारखा जोडीदार

Dasara Shubh Yog : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसऱ्याला अनेक राशींच भाग्य उजळणार आहे.
Dasara Rashi Bhavishya 2023
Dasara Rashi Bhavishya 2023Saam Tv
Published On

Dasara 2023 Horoscope

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी दसरा हा सण २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसऱ्याला अनेक राशींच भाग्य उजळणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार प्रत्येक राशीत संक्रमण करत असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम राशीवर होत असतो. या दिवशी वाहन आणि शस्त्रांची पूजा केली जाते. यंदाच्या विजयादशमीला दुर्मिळ योग तयार झाला आहे. गुरु आणि शुक्र समोरासमोर आल्यामुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे. याशिवाय सूर्य आणि बुध तुळ राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार झाला आहे. त्यामुळे ३ राशींचे भविष्य चमकणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कर्क

दसऱ्याला कर्क राशींच्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल. तसेच सन्मानही मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी (Job) करणाऱ्यांची उन्नती होईल. व्यवसायात गुंतवणूक (Investment) केल्यास फायदा होईल.

2. तुळ

या लोकांना आर्थिक (Money) लाभ होणार आहे. या महिन्यात अधिक प्रमाणात बचत कराल. आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात मोठे यश मिळेल. नोकरीत पद वाढू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

Dasara Rashi Bhavishya 2023
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : दसऱ्याचा शुभ मुहूर्त: या राशींना करिअरमध्ये मिळणार मोठं यश; आरोग्याची काळजी घ्या

3. कुंभ

यावेळी नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमीयुगलांसाठी हा दसरा शुभ ठरेल. मनासारखा जोडीदार लवकरच मिळणार आहे. इच्छुकांचे विवाह जमतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com