Bowel Cancer: भारतामध्ये दर दिवशी कॅन्सरच्या गंभीर आजारामुळे अनेकांचे निधन होत असते. हा आजार एकदा झाला की, त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. मात्र आता डॉक्टरांनी यावर ५ भन्नाट उपाय दिले आहेत. कारण जीवघेण्या कॅन्सरपासून वाचवण्यासाठी काही महत्वाची लक्षणे आपल्याला सहसा कळत नाहीत. असे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले आहे. यामध्ये बॉवेल कॅन्सर म्हणजेच आतड्याचा कॅन्सरची लक्षणे आणि रिसर्च बद्दल माहिती सांगितली आहे.
कॅन्सरची प्रमुख कारणे
कॅन्सरचा रिसर्च यूके च्या आकडेवारीनुसार दरवर्षी ४४,१०० लोकांना या आजाराची लागण होते, तर १६,८०० लोकांचा या आजाराने मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे ५० वर्षांखालील तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामध्ये आतड्याचा कॅन्सर झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुणांनी त्याची लक्षणे वेळेत समजली तर जीव वाचू शकतो. त्यांनी या आजाराची प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. पोटात सतत वेदना होणे, अचानक वजन घटणे, सतत थकवा जाणवणे, लघवीला, शौचाला त्रास होणे किंवा रक्त येणे, शौचाच्या सवयींमध्ये सातत्याने बदल होणे ही त्यातील मुख्य लक्षणे आहेत.
कॅन्सरची प्रमुख लक्षणे
तज्ज्ञांच्या मते, पोटात सतत वेदना होत असतील आणि त्या कमी होत नसतील तर हे धोक्याचे लक्षण असू शकते. वजन अचानक कमी होत असेल तर हे लक्षण तपासणे महत्त्वाचे आहे. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर त्यामागे रक्ताची कमतरता असू शकतं आणि ते कॅन्सरमुळे होत असतं. शौचाला जाताना रक्त दिसणं ही कधीही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, कारण ते फक्त मूळव्याधामुळे आहे असे समजून गप्प बसणे हे जीवावर बेतू शकतं. यासोबतच, शौचाची सवय अचानक बदलणे, सतत बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणे ही गंभीर लक्षणे आहेत.
तज्ज्ञांनी असेही सांगितले की, या आजारापासून वाचण्यासाठी काही साध्या जीवनशैलीतील बदल मदत करू शकतात. आहारात भरपूर प्रमाणात पौष्टीक पदार्थांचा समावेश करणं, धूम्रपान व व्हेपिंग सोडणे, मद्यपान टाळणे या गोष्टींचा थेट फायदा होतो. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक साधी सवय तुम्हाला निरोगी ठेवते. दरवेळी शौचानंतर आपल्या शौचाचे निरीक्षण करा. यामुळे शरीरातील बदल वेळेत लक्षात येतात. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.