International Day Of Abolition For Slavery  Saam Tv
लाईफस्टाईल

International Day Of Abolition For Slavery : आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

International Day Of Abolition For Slavery : जगभरातून गुलामगिरी संपवण्यासाठी दरवर्षी २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा केला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली गुलामगिरी आजही या ना त्या स्वरूपात कायम आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय (International) गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे.

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या (State) आमसभेने एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये २ डिसेंबर रोजी गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

थीम -

सध्याच्या गुलामगिरीचा अंत करणे ही या दिवसाची मुख्य थीम आहे. यामध्ये मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, सक्तीचे विवाह, मुलांवर दबाव आणणे आणि शस्त्रांच्या शर्यतीत भरती करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हे सर्व प्रकार आधुनिक युगातील गुलामगिरीचे प्रतीक आहेत.

गुलामगिरी निर्मूलन दिवसाची पार्श्वभूमी -

२ डिसेंबर १९४९ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन स्वीकारण्यात आला. मानवी तस्करी थांबवणे आणि वेश्याव्यवसाय थांबवणे हा यातील मुख्य उद्देश होता.

ठराव ३१७ (IV) दोन्ही गुलामगिरीचे प्रतीक मानून पारित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या मते, अंदाजे ४०.३ दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीचे बळी आहेत. २४.९ दशलक्ष मजूर आणि १५.४ दशलक्ष सक्तीचे विवाह समाविष्ट आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक गुलामगिरीला बळी पडलेल्या प्रत्येक ४ पैकी १ मूल आहे.

महत्त्व -

गुलामगिरी निर्मूलन दिनापासून बंधपत्रित मजुरांप्रमाणे जगणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. याबाबत मुलांना व पालकांना सांगून यापासून बचावासाठी उपाययोजना करता येतील.

याशिवाय कामाच्या नावाखाली लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांचे शोषण थांबवण्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. महिला वर्ग व बालकांना सामान्य जीवन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुलामगिरीतून कार्यक्रम आयोजित करून ते थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

गुलामगिरी निर्मूलन दिन कसा साजरा करायचा -

या दिवशी विचारवंत त्यांचे संशोधन आणि डेटा सेमिनारमध्ये मांडतात आणि लोक आपापल्या पद्धतीने लेखन साहित्याद्वारे त्यांचे विचार व्यक्त करतात. कालांतराने गुलामगिरी कशी थांबली पाहिजे यावर चर्चा आणि आढावा सत्रे होतात. वादविवाद आणि वादविवादांव्यतिरिक्त लोकांना जागरूक करण्यासाठी भाषणे आणि भाषण सत्र आयोजित केले जातात.

Edited By - Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT