Happy International Men's Day 2022 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या, त्याचा इतिहास व थीम

19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
Happy International Men's Day 2022
Happy International Men's Day 2022Saam Tv
Published On

Happy International Men's Day 2022 : दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्टे म्हणजे पुरुषांचे मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचे कौतुक, समाजात उपस्थित असलेल्या मेन्स रोल मॉडेल्सना मुख्य प्रवाहात आणणे, लैंगिक समानतेला ओळख मिळावी.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन संघ, समाज, समुदाय, राष्ट्र, कुटुंब, विवाह आणि बालसंगोपन यातील मुला-पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यास आणि ओळखण्यास मदत करतो.

पुरुषांच्या (Mens) समस्यांबद्दल मूलभूत जागरुकता वाढवणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात (India) पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी पुरुषांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. पुरुष दिन साजरा करण्याचा इतिहास, महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

Happy International Men's Day 2022
Men's Fashion Style : दाढीला स्टायलिश लुक द्यायचा आहे ? तर, 'या' टिप्स फॉलो करा

पुरुष दिवस 2022 थीम (International Men's Day 2022 Theme)

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 ची थीम ''Helping Men and Boys''

इतिहास

थॉमस ऑस्टर हे मिसूरी सेंटर फॉर मेन्स स्टडीजचे संचालक होते आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी महिन्यात छोटे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यू.एस., ऑस्ट्रेलिया आणि माल्टा येथील संस्थांना आमंत्रित केले. ऑस्टरने दोन वर्षे या कार्यक्रमांचे आयोजन केले, परंतु 1995 मध्ये खूप कमी संस्थांनी या कार्यक्रमात भाग घेतला, परिणामी कार्यक्रम बंद करण्यात आला.

1999 मध्ये पुन्हा पुरुष दिन साजरा करण्याचा उपक्रम

जेरोम तेलकसिंग यांनी 1999 मध्ये त्या दिवसाचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांना समजले की पुरुषांचा कोणताही दिवस नाही. त्यांना सकारात्मक पुरुष आदर्शांचे महत्त्व देखील समजले आणि त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी त्यांच्या वैयक्तिक आदर्श, त्यांच्या वडिलांची जयंती देखील होती. तेव्हापासून, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नकारात्मक लिंग स्टिरियोटाइपऐवजी पुरुष ओळखीच्या सकारात्मक पैलूंना प्रोत्साहन देतो. हा दिवस पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे आणि सकारात्मक पुरुषत्वाचे महत्त्व अधोरेखित करतो.

Happy International Men's Day 2022
Skin care tips for men: तेलकट त्वचेपासून त्रस्त आहात ? 'या' घरगुती पदार्थांचा अवलंब करा

भारतात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधीपासून साजरा करण्यात आला

भारतात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यास बरीच वर्षे लागली आणि 2007 मध्ये हैदराबादच्या लेखिका उमा चल्ला यांनी याची सुरुवात केली. हे म्हणण वावग ठरणार नाही की, महिलांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व

सर्व पुरुष भिन्न आहेत पण त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्या योगदानासाठी एक दिवस साजरा केला पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. समाजाकडून सतत त्यांच्यावर टाकला जाणारा दबाव पुरुषांनी कमी करण्याचा हा दिवस आहे. समाजाची अपेक्षा आहे की त्यांनी प्रदाता व्हावे, मजबूत असावे आणि मदत मागू नये. आजचा दिवस या स्टिरियोटाइप तोडण्याचा आणि पुरुषत्वाची सकारात्मक व्याख्या करण्याचा आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com