THypothyroidism Saam TV
लाईफस्टाईल

Hypothyroidism Details: 'हायपोथायरॉईडीझम' ची लक्षणं, कारणं, उपाय जाणून घ्या सविस्तर

Hypothyroidism symptoms, causes and remedies in Marathi: बदलत्या जीनशैलीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. प्रौढांमध्ये वाढत असलेल्या हायपोथायरॉइडिजम विकाराविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Shreya Maskar

हायपोथायरॉइडिजम समस्या प्रौढांमध्ये जास्त आढळते. चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या थायरॉईड ग्रंथींचे प्रमाण कमी होते तेव्हा हायपोथायरॉइडिजम ची समस्या उद्भवते. यामुळे चयापचय क्रिया मंदावते. हायपोथायरॉइडिजम असल्यास थकवा, अशक्तपणा, वजन वाढणे, चिडचिड, नैराश्य यासारख्या समस्या उद्भवतात.

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे

  • महिलांचे मासिकपाळी चक्र अनियमित होणे.

  • पोटासंबंधित समस्या उद्भवणे. उदा. बद्धकोष्ठता

  • हृदयाची गती मंदावते.

  • त्वचा कोरडी होते.

  • केस गळती वाढते आणि केसांचे आरोग्य खराब होते.

  • सतत थकवा जाणवतो.

  • थायरॉइड ग्रंथींवर सूज येते.

  • वजन नियंत्रणात राहत नाही.

  • झोपचे च्रक बिघडते. खूप वेळ झोप लागते.

  • हात पाय कायम थंड राहतात.

हायपोथायरॉईडीझमची कारणे

  • हाशिमोटो थायरॉयडिटिस हे हायपोथायरॉईडीझमचे मुख्य कारण आहे. व

  • आपली रोगप्रतिकारकशक्ती थायरॉइड ग्रंथींविरुद्ध कार्य करते. त्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि हायपोथायरॉइडिजम होण्याची शक्यता निर्माण होते.

  • रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयोडिन ट्रीटमेंटच्या अतिवापरामुळे ही हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो.

  • रोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉइडिजम होतो.

  • महिलेला बाळंतपणानंतर हायपोथायरॉइडिजम होऊ शकतो.

  • आधी थायरॉइड ग्रंथींच्या शस्त्रक्रिया झाली असल्यास हायपोथायरॉइडिजम होण्याचा धोका वाढतो.

  • कधीतरी औषधांच्या साईड इफेक्टमुळे देखील हायपोथायरॉइडिजम होतो.

  • मेंदूमधील हायपोथॅलेमस विकारांमुळे हायपोथायरॉईडिजम होण्याची शक्यता वाढते.

आरोग्यावर परिणाम

  • हायपोथायरॉइडिजममुळे अनेकांना हृदयाच्या समस्या उद्भवतात.

  • हायपोथायरॉइडिजममुळे सांधेदुखीचा त्रास होतो.

  • या मध्ये मोठ्या प्रमाणात वजन वाढून लठ्ठपणा येतो.

हायपोथायरॉईडीझमचे निदान

  • हायपोथायरॉईडीझमचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या केल्या जातात.

  • शरीरातील हॉर्मोनचा स्तर जाणून घेऊन त्या अनुषंगाने औषधे घ्यावी लागतात.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT