Interview Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Interview Tips: वारंवार इंटरव्ह्यू देऊनही नोकरी मिळत नाही? 'या' टिप्स फॉलो करा अन् मिळवा नोकरी

Tips For Successful Interview in Marathi: मुंबईसारख्या शहरात उदरनिर्वाह करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी असणे खूप महत्वाचे आहे. वारंवार नोकरीला अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल तर अर्ज करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

Shreya Maskar

नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी अनेक अडचणी येत असतात. कंपनी एचआर उमेदवाराला कोणते प्रश्न विचारेल किंवा कोणत्या प्रश्नाचं कशाप्रकारे उत्तरं द्यावं हे उमेदवाराला माहिती नसतं. मुलाखतीचा अनुभव नसल्याने शिक्षण असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही. दरम्यान नोकरी मिळवण्यासाठी 'या' दोन गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे.

नोकरी मिळवण्यासाठी दोन गोष्टी योग्य असणे महत्वाचे आहे.

  • बायोडाटा

  • इंटरव्ह्यू

बायोडाटा कसा असावा?

  • तुमचा बायोडाटा चारचौघांमध्ये उठून दिसायला हवा. म्हणजे तुम्हाला नोकरीची संधी मिळेल.

  • बायोडाटा हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला चेहरा आहे. जो तुमच्या आधी कंपनीपर्यंत पोहचतो. त्यामुळे तो छान असावा.

  • बायोडाटा लिहिताना कोणत्याही व्याकरणाच्या चुका करू नये.

  • बायोडाटामध्ये मोजके व मुद्देसूद लिहिणे महत्त्वाचे आहे.

  • बायोडाटा कंपनीमध्ये देताना नेहमी त्यांची रंगीत प्रिंट द्यावी.

  • बायोडाटावर तुमचा फोटो असणे गरजेचे आहे.

  • बायोडाटा कधीही आपल्याला हव्या असलेल्या पदाला अनुसरून लिहावा.

  • आपल शिक्षण, कामातील अनुभव आणि आपल्यातील इतर कलागुण बायोडाटामधून स्पष्ट दिसले पाहिजेत.

इंटरव्ह्यू कसा द्यावा?

  • तुमचा बायोडाटा आवडल्यावर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवले जाते आणि तेव्हा तुमची खरी परीक्षा असते.

  • इंटरव्ह्यूला जाताना आपला पोशाख नीट असावा. फोर्मल कपडे परिधान करावे.

  • आपण कोणत्या पदासाठी अप्लाय केल आहे. त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून जावा.

  • कधीही तुमचे सोशल मीडिया अकाउंट अपडेटेड असावे. कारण या माध्यमातून तुम्ही सर्वप्रथम एचआरच्या संपर्कात जाता.

  • आजकालच्या अपडेटेड जगात तुम्हाला स्वतःलाच तुमच्या कलागुणांच मार्केटिंग करता येईला पाहिजे.

  • एचआरने विचारलेला प्रश्न नीट ऐकून मग त्याचे उत्तर द्यावे. घाईघाईत उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते.

  • कधीही इंटरव्ह्यूला न घाबरता आत्मविश्वाने सामोरे जायला हवे.

  • ज्या कंपनीत तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात त्या कंपनीची संपूर्ण माहिती करून घ्यावी.

  • तुम्ही कंपनीसोबत काम करण्यास खूप उत्साही आहात.हे तुमच्या वागण्यातून एचआरला समजले पाहिजे. त्यामुळे कंपनी व कामासंबंधी एचआरशी चर्चा करावी.

  • सर्वात महत्वाचे तुमच्या आधीच्या कंपनीविषयी एचआरसमोर नकारात्मक बोलू नका.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT