Jamun Seeds Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Jamun Seeds Benefits : इवल्याशा जांभाळाच्या बीचे आरोग्याला असंख्य फायदे, जाणून घ्या

Jamun Seeds : जांभाळामुळे अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Benefits Of Jamun Seeds : जांभूळ हे एक हंगामी फळ आहे, जे उन्हाळ्यात मिळते. हे फळ अतिशय चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जांभाळामुळे अनेक आजारांचा धोकाही कमी होतो पण तुम्हाला माहिती आहे का, जांभाळापेक्षा त्याच्या बिया आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या गुणधर्मांसह इतर अनेक पोषक घटक देखील त्यात आढळतात.

जांभूळ खाल्ल्यानंतर लोक (People) बर्‍याचदा त्याच्या बिया फेकून देतात. त्यांना फेकण्याऐवजी तुम्ही उन्हात वाळवू शकता. नंतर त्याची बारीक करून पावडर तयार करा आणि स्वच्छ डब्यात ठेवा. याचे सेवन दूध, सॅलाड सोबत करता येते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी जांभळाचे फायदे सांगितले आहेत. ते आरोग्यासाठी (Health) कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर -

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभाळाच्या बिया खूप फायदेशीर (Benefits) आहेत. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. या बियांमध्ये असलेले जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन हे पदार्थ आहेत जे रक्तातील साखर कमी करतात आणि शरीरात इन्सुलिनची पातळी वाढवतात. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो.

शरीर डिटॉक्स करते -

या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. ज्याद्वारे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

यकृतासाठी फायदेशीर -

यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म यकृताच्या पेशींचे संरक्षण करतात. याशिवाय जांभाळाच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे यकृताची सूज कमी करण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त -

जामुनच्या बियांच्या पावडरमध्ये इलॅजिक अॅसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे रक्तदाबाच्या जलद चढउतारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते .

या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

SCROLL FOR NEXT