Astrology SAAM TV
लाईफस्टाईल

Astrology : डोळ्यांच्या रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, जाणून घ्या कोण नशीबवान?

Shreya Maskar

डोळा हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच डोळ्यांनी संवादही घडू शकतो. अनेक लोकांच्या मनातले भाव डोळ्यात स्पष्टपणे दिसून येता. ज्योतिषशास्त्रानुसार या डोळ्यांच्या साहाय्याने आपण व्यक्तींचा स्वभाव ओळखू शकतो. आपल्या बुबुळाचा रंग आपले व्यक्तिमत्त्व स्पष्ट करतो.

काळे डोळे

काळे डोळे असलेल्या व्यक्ती दिसायला खूप सुंदर असतात. त्यांचे डोळे त्यांच्या मनाचे भाव सांगतात. कोणतीही जबाबदारी घेण्यास ते कायम तयार असतात. अशी लोक तुम्हाला कधीच धोका देत नाहीत. त्यांना आपल आयुष्य गुपित ठेवायला आवडते.

घारे डोळे

घारे डोळे असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप आकर्षित असते. आपल्या बोलण्याने ती लोक अनेकांची मने जिंकतात. ही लोक खूप आत्मविश्वासू असतात. जिद्दीने प्रत्येक काम पूर्ण करण्याचा यांचा प्रयत्न असतो. दिलेला शब्द कसा पाळावा कोणी यांच्याकडून शिकावे. घारे डोळे असलेल्या व्यक्तींमध्ये मॅनेजमेंट कौशल्य उत्तम असतात.

हिरवे डोळे

हिरवे डोळे असलेल्या लोकांची संख्या तुलनेने खूप कमी असते. मात्र ही लोक दिसायला खूप सुंदर असतात. ही लोक हुशार आणि बुद्धिमान असतात. परंतु चार चौघांमध्ये बोलायची यांना भीती वाटते. या लोकांना आपल्या मनातले पटकन कोणाला सांगता येत नाही.

निळे डोळे

निळे डोळे असलेल्या व्यक्ती स्वभावाने शांत आणि दयाळू असतात. दुसऱ्यांना मदत करायला यांना खूप आवडते. खूप निष्ठेने एखाद्याशी नातं जोडतात आणि शेवटपर्यंत निभवतात. यांचे डोळे खूप रेखीव दिसतात. पण यांच्या साध्या स्वभावाचा अनेक लोक गैरफायदा घेतात.

राखाडी डोळे

राखाडी डोळे असलेली लोक खूप भावनिक असतात. ते सर्वांना समजून घेतात. छोट्या गोष्टींवर रागवत नाही. कोणत्याही व्यक्तीवर त्यांचा प्रभाव पटकन पडतो.

तपकिरी रंगाचे डोळे

तपकिरी रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती आकर्षक, क्रिएटिव्ह आणि संवेदनशील असतात. एखादी गोष्ट ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत हे लोक ती गोष्ट पूर्ण करतात. बहुतेक वेळा त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशी लोक खूप साहसी असतात. यांना नवीन गोष्टी सतत शिकत राहायला खूप आवडते. कोणतीही गोष्ट स्वीकारून पुढे जायची ताकद यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असते. अशा व्यक्ती एकच काम सातत्याने केल्यास त्यांना कंटाळा येतो. आयुष्यामध्ये त्यांना सतत बदल हवा असतो. मात्र नातं टिकवण्याच्या बाबतीत ही लोक कच्ची असतात.

डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्र आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT