Child Care Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Child Care Tips: लहान वयात तुमची मुलं शिव्या देतात? आजच मित्रांची संगत बदला, नाहीतर...

Child Using Bad Language : बाहेरच्या वाईट संगतीमुळे लहान मुले मोठ्या प्रमाणात शिव्या घालू लागतात. याचा त्यांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना वेळीच थांबवणे हे पालकाचे कर्तव्य आहे.

Shreya Maskar

मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी लहान वयात त्यांच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यांसाठी पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपले मुलं काय करते, कुठे जाते याची संपूर्ण माहिती पालकांकडे असणे महत्वाचे आहे.

इतर मुलांसोबत खेळताना आपल्या मुलाला वाईट संगत लागणार नाही याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. कारण वाईट संगतीमुळे मुलं वाईट मार्गावर चालू लागतात. तसेच शिव्या घालू लागतात. मोठ्याने बोलतात. मोठ्या लोकांचा आदर करत नाही. त्यामुळे पालकांनी लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार करावे आणि मुलांना चांगल्या संगतीमध्ये वाढवावे.

मुलांना अति लाड टाळा

मुलांना अति लाडात वाढू नये. मुलांना योग्य वेळी शिकवण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांनी पहिल्यांदाच शिवी घातल्यास त्याला रोखून समजावून सांगावे. तसेच तुमच्या मुलांची शिवी घालण्याची सवय बंद झाले आहे का? यावर पालकांनी लक्ष ठेवावे. कारण पालकांच्या अपरोक्ष मुलं शिव्या घालू शकतात. लहान वयापासून शिव्या घालण्याची सवय भविष्यात महागात पडू शकते.

मुलांना वाईट संगतीपासून दूर ठेवा

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मुलांची संगत कोण आहे हे पालकांना माहीत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपले मुलं कोणत्या मित्रमंडळींसोबत राहते याची माहिती प्रत्येक पालकाला असणे गरजेचे आहे. मुलांना बाहेरच्या संगतीमुळे शिव्या देण्याची सवय लागू शकते. ते तुमच्यासमोर नाही पण बाहेर इतरांना चारचौघात मोठ्या घाण शिव्या देऊ शकतात. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खराब होऊ शकते. वारंवार अपशब्द मुलांच्या कानावर पडल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होताना दिसून येतो. वाईट संगतीमध्ये मुलांनी जास्त वेळ घालवल्याचे त्यांचे भविष्य धोक्यात येते. त्यामुळे वेळीच मुलांना आवर घाला. वाईट मित्रांसोबत त्यांचे खेळणे किंवा फिरणे बंद करा. चुकीच्या संगतीमुळे मुलं वाईट मार्गावर चालू लागतात. त्यामुळे वेळीच त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे आयुष्य सुरक्षित करा.

पालकांची वर्तणूक

पालक हा मुलांचा पहिला गुरु आणि पहिला शिक्षक असतो. मुले आपल्या पालकांचे पदोपदी अनुकरण करत असतात. त्यामुळे चुकूनही पालकांनी आपल्या मुलांसमोर शिव्या घालू नये. तसेच कोणताही अपशब्द वापरू नये. जेणेकरून पुढे जाऊन मुले हे शब्द पुन्हा आपल्या बोलण्यात वापरतील.

नैतिक शिक्षण

पालकांनी लहान वयात मुलांना नैतिक शिक्षणाचे धडे द्या. त्यांच्यावर चांगले संस्कार करा. छोट्या छोट्या गोष्टींतून आयुष्याची मोठी आणि योग्य शिकवण द्या. समाजात महिलांचा आदर करायला शिकवा. तसेच प्रेरणात्मक गोष्टी वाचायची सवय लावा. लहान वयात मुलांना योग्य आणि अयोग्य काय याची जाणीव करून द्या. चुकीच्या संगतीपासून आणि चुकीच्या सवयींपासून दूर ठेवा. यामुळे भविष्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. तुमचे मुलं भारताचे सुजाण नागरिक बनेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT