Kitchen Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Vastu Tips: किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; नाहीतर, घरात होऊ शकते पैश्याची तंगी

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार किचनच्या ओट्यावर काही वस्तू ठेवणे टाळावे. तुटलेली भांडी, औषधे, रिकामे डबे आणि इतर वस्तूंबाबतच्या महत्त्वाच्या वास्तु टिप्स जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Kitchen Vastu Tips: घरातील स्वयंपाकघर ही अत्यंत महत्त्वाची जागा असते. कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केले जाते. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराचा संबंध घरातील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. अनेकदा आपण किचनच्या ओट्यावर गरजेच्या आणि अनावश्यक वस्तू ठेवतो. मात्र, वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार काही वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे. या वस्तूंमुळे घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया, किचनच्या ओट्यावर कोणत्या ७ वस्तू ठेवणे टाळावे.

तुटलेली किंवा फुटलेली भांडी

अनेकांच्या घरात तुटलेले कप, ताटं किंवा तडा गेलेल्या वाट्या वापरतात. वास्तुशास्त्रानुसार अशी तुटलेली भांडी घरात ठेवणे चांगले नाही. ते नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वापरण्यास योग्य नसलेली भांडी घरातून काढून टाका.

स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका

अनेकजण औषधे विसरू नयेत म्हणून किचनच्या ओट्यावर ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात औषधे ठेवणे टाळावे. तसेच गॅसजवळील उष्णता आणि स्वयंपाक करताना निर्माण होणारी वाफ यामुळे काही औषधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे औषधे थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.

रिकामे डबे ओट्यावर ठेवू नका

स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी, पीठ आणि मसाल्यांचे अनेक डबे असतात. मात्र, हे डबे रिकामे झाल्यानंतरही अनेक दिवस ओट्यावर ठेवले जातात. वास्तुशास्त्रानुसार रिकामे डबे अपूर्णतेचे प्रतीक आहे. त्यामुळे रिकामे डबे स्वच्छ करून योग्य ठिकाणी ठेवा.

गॅसच्या समोर आरसा लावू नका

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरात अग्नी तत्वाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे गॅस शेगडीच्या अगदी समोर आरसा लावणे टाळावे. आरशामध्ये गॅसचे प्रतिबिंब दिसणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे किचनमध्ये आरसा लावताना त्याची जागा काळजीपूर्वक निवड करा.

साफसफाईचे सामान ठेवू नका

किचन स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे ब्रश, कपडे, स्पंज आणि इतर साहित्य अनेकदा ओट्यावरच ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू ओट्यावर ठेवणे योग्य नाही. तसेच यामुळे स्वयंपाकघर अस्ताव्यस्त दिसते.

खराब आणि शिळे अन्नपदार्थ ठेवू नका

स्वयंपाकघरात खराब झालेली फळे, भाज्या किंवा शिळे अन्न उघडे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात नकारात्मकता निर्माण करतात. याशिवाय खराब अन्नामुळे दुर्गंधी आणि जंतू वाढू शकतात.

गरज नसलेल्या वस्तू

किचनच्या ओट्यावर गरज नसलेल्या वस्तू, जुने डबे आणि इतर सामान साठवून ठेवू नका. यामुळे स्वयंपाकघरातील जागा कमी होते आणि काम करताना अडचण येते. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर सकारात्मक वातावरणासाठी चांगले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साताऱ्यात ९ शिक्षकांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे न दिल्याने कारवाई

Bank Loan : कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करणार पैसे? वाचा महत्त्वाचा नियम

Indian Traditions : हिंदू विवाहित महिला पायाच्या दुसऱ्या बोटातच जोडवी का घालतात? जाणून घ्या यामागील खास कारण

भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वातील अनुभवी चेहरा हरपला; माजी खासदाराचं निधन,राजकीय वर्तुळात शोककळा

मला पालकमंत्री करा...; भर सभेत शिंदेंसमोरच शरद पवारांच्या खासदाराचं मोठं विधान, घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT