Kitchen Tips, How to stored Milk Powder Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Tips : दूधाच्या पावडरला अधिक काळ साठवाल? त्याची योग्य पध्दत कोणती ? जाणून घ्या

काही घरामध्ये दूधाचा वापर हा सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळी केला जातो.

कोमल दामुद्रे

Kitchen Tips : दूध हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरांचा महत्त्वाचा हिस्सा आहे. दूधाचे सेवन चहा, कॉफी (Coffee) किंवा इतर मिठाईच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.

काही घरामध्ये दूधाचा वापर हा सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळी केला जातो. सतत चहा पिणाऱ्यांना दूध संपते की, काय असे वाटत असल्यामुळे ते दूधाऐवजी त्याच्या पावडरचा वापर करतात.

दूधाच्या पावडरला मिल्क पावडर देखील म्हटले जाते परंतु, त्यांची संपण्याची देखील तारीख असते का ? याला योग्य पध्दतीने साठवून नाही ठेवले तर ते खराब होऊ शकते. त्यासाठी त्याचे योग्य तापमान देखील आपल्याला माहित असायला हवे. तसेच ते योग्य जागी देखील ठेवायला हवे.

मिल्क पावडर साठवूण ठेवण्याची आवश्यकता काय आहे ?

दूधाचा पावडर खूप लवकर खराब होतो. या पावडरला पाणी लागले की, तो खराब होतो. यामध्ये जीवनसत्त्व ए व ड याचे प्रमाण असते. प्रकाशामुळे दूधाचा पावडर खराब होऊ शकतो. त्यासाठी त्याला थंड हवामानाची गरज असते.

याला साठवण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करु शकतो किंवा आपल्या घरातील अशा ठिकाणी त्याला ठेवू शकतो जिथे जागा थंड असेल. जर पावडरचा कंटेनर पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक असल्यास आपण तो दुसऱ्या भांड्यात ठेवावे. ते शक्य तितके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

नायट्रोजन किंवा कार्बन डायऑक्साइडसह कॅन केलेला दुधाची पावडर ऑक्सिजन असलेल्या हवेच्या जागी ठेवा. आपण जर पावडरचे पॅकेट वापरत असू तर ते योग्य आणि घट्टपणे बंद करणे फार महत्वाचे आहे.

पावडर दुधाचे शेल्फ लाइफ काय आहे?

पावडर खराब होऊ शकते, परंतु यास थोडा वेळ लागतो. बहुतेक उत्पादक १८ महिन्यांच्या आत दूधाची पावडर वापरण्याचा सल्ला देतात. यूएसडीए नुसार, दूधाचा पावडर साठवला जाऊ शकतो. जर आपण पावडरचे पॅकेट उघडले नाही तर ते अधिक काळ टिकू शकते.

अधिक काळ कसे साठवाल ?

दूधाचा (Milk) पावडर जास्त काळ साठवण्यासाठी, दूधाला मायलार बॅगमध्ये ठेवा. असे केल्यास आपण त्याला अधिक काळ साठवू शकतो.

फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये कसे साठवायचे ?

तापमान कमी केल्याने पावडरचे शेल्फ लाइफ वाढू शकते. ९० एफ तापमानात पावडर खराब होऊ लागते आणि १०४ एफ तापमानात ती १ महिन्याच्या आत खराब होते. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते ३ ते ४ वर्षांपर्यंत साठवता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT