how to store rice and lentils for a long time without bugs  saam tv
लाईफस्टाईल

Kichen Tips : तांदूळ आणि डाळीत किडे झालेत? फेकून देण्याआधी करा हे 5 सोपे उपाय; धान्य राहील सुरक्षित!

how to remove weevils from rice and dal : तांदूळ आणि डाळींमध्ये किडे व अळ्या पडतात त्या घालवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय नक्की करून पहा, जेणेकरून धान्य अजिबात फेकून द्यावे लागणार नाही.

Saam Tv

घरात तांदूळ, डाळ आणि इतर धान्य साठवताना अनेकदा त्यामध्ये छोटे-छोटे किडे किंवा भुंगे आढळतात. धान्य हवाबंद डब्यात ठेवूनही काही वेळा ही समस्या उद्भवते. विशेषतः धान्यात ओलावा निर्माण झाल्यास किड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे संपूर्ण धान्य खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी लगेच धान्य फेकून देण्याऐवजी काही घरगुती उपाय करता येतात. जाणून घेऊया हे उपाय

तांदळाच्या डब्यात ठेवा तमालपत्र

तांदळामध्ये किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्राचा वापर करता येतो. तांदळाच्या डब्यात चार ते सहा तमालपत्रे ठेवा. डब्याचे झाकण व्यवस्थित बंद ठेवल्यास किड्यांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत होऊ शकते.

लवंग ठरू शकते फायदेशीर

लवंगाचा तीव्र वास किड्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. यासाठी तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात काही लवंगा ठेवा. मात्र, लवंग थेट धान्यात मिसळण्याऐवजी छोट्या स्वच्छ पिशवीत ठेवणे अधिक सोयीचे ठरते.

फ्रिजमध्ये ठेवा धान्य

तांदळामध्ये छोटे किडे किंवा भुंगे दिसू लागल्यास तो काही काळ फ्रीजमध्ये ठेवण्याचा उपाय करता येतो. डाळही कमी प्रमाणात हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत ठेवता येते.

लसणाच्या पाकळ्यांचा करा वापर

तांदळाच्या डब्यात सोलून न ठेवलेल्या लसणाच्या काही पाकळ्या ठेवल्याने किड्यांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. लसूण सुकल्यानंतर तो बदलून नवीन पाकळ्या ठेवाव्यात. डाळीच्या डब्यातही चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेवण्याचा उपाय सांगितला जातो.

धान्य उन्हात वाळवा

तांदूळ किंवा डाळीमध्ये किडे दिसल्यास ते स्वच्छ कापडावर पसरवून उन्हात ठेवण्याचा उपाय करता येतो. तांदूळ एक दिवस, तर डाळ दोन ते तीन दिवस उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर धान्य स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या हवाबंद डब्यात साठवावे.

डाळीमध्ये कडुलिंबाच्या वाळलेल्या काड्या ठेवा

डाळीला किडे लागू नयेत यासाठी डब्यात कडुलिंबाची वाळलेली काडी ठेवण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते.

सुक्या लाल मिरच्यांचाही होतो उपयोग

डाळीच्या डब्यात दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या ठेवल्याने किड्यांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच डब्यात आठ ते दहा लवंगा ठेवण्याचाही उपाय सांगितला जातो.

धान्य साठवताना ही काळजी घ्या

धान्य नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात साठवा. ओल्या हातांनी डब्यातून धान्य काढणे टाळा. डब्यांमध्ये ओलावा जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच धान्यात बुरशी, कुबट वास किंवा जाळी दिसल्यास ते खाणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गावांचा विकास हाच विकसित महाराष्ट्राचा पाया – मंत्री जयकुमार गोरे

नोटांचे बंडल, विदेशी चलन अन् सोन्याच्या विटा; CBIनं CGST अधीक्षकाच्या घरात टाकलेल्या धाडीत काय-काय सापडलं?

Lemon Storage Tips: लिंबू आठवडाभर ताजे आणि टवटवीत ठेवण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Ind vs NZ : टीम इंडियानं 'करून दाखवलं'! ९४ वर्षांत पहिल्यांदाच विक्रमाला गवसणी

दिग्गज नेत्याचा भाजपला रामराम; विरोधी पक्षात केला प्रवेश, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT