Kitche Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Tips: गॅस पाईपची एक्सपायरी डेट कशी तपासायची? 'हे' ॲप करणार मदत

Gas Cylinder Pipe Expiry Date: अनेकदा आपल्या गॅस पाईपची मुदत संपते. तो जीर्ण होतो. तरीही तो वापरला जातो. त्यामुळे आपल्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते.

Rohini Gudaghe

Gas Cylinder Pipe Expiry Date Checking App

गॅस सिलिंडर (Gas Cylinder) हे आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचं साधन आहे. गॅस सिलिंडर वापरताना सुरक्षेची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याच्या, आग लागल्याच्या घटना ऐकतो. आपण सुरक्षिततेसाठी गॅस पाईपची एक्सपायरी तारीख तपासणं महत्त्वाचं आहे. जराही बेफिकीर राहिल्यास सिलिंडर फुटण्याचा धोका असतो. आज आपण याविषयी सावधगिरी कशी बाळगायची ते जाणून घेऊ या. (latest marathi news)

गॅस पाईप रबरने बनवलेले असतात. एका विशिष्ट कालवधीनंतर रबर खराब होते आणि गॅस गळतीचा धोका वाढतो. गॅस गळतीमुळे आग आणि गंभीर अपघात होऊ शकतात. यामध्ये जीवित व वित्तहानी होऊ (Gas Cylinder Pipe Expiry Date) शकते. म्हणून, गॅस पाईप वेळेत बदलणं आवश्यक आहे. आपण गॅस पाईपची मुदत संपली आहे की नाही, हे वेळोवेळी तपासण गरजेचं आहे. आपण ऑनलाइन पद्धतीचा वापर करून ते तपासू शकतो.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गॅस पाईपची एक्सपायरी डेट कशी तपासायची?

गॅस पाईपवर एक्सपायरी डेट लिहिली जाते. वास्तविक ही पाईपच्या परवान्याची तारीख असते. ती आपल्याला गॅस पाईपवर लिहिलेली दिसते. आपण भारत सरकारच्या BIS केअर ॲपवर (BIS Care App) ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने प्रमाणित केलेल्या गोष्टींची माहिती पाहू शकतो.

BIS Care ॲप भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विकसित केले आहे. हे ॲप Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. गॅस पाईपची कालबाह्यता तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया आहे.

ॲपमध्ये डेट कशी चेक करायची?

  • सुरूवातीला BIS केअर ॲप उघडा.

  • यामध्ये Verify License Details या पर्यायावर टॅप करा.

  • आता पाईपवर लिहिलेला CM/L कोड टाका.

  • कोड टाकल्यानंतर गो बटणावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला गॅस पाईपची तारीख दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT