Ruchika Jadhav
घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटना शहरांमध्ये वाढल्या आहेत.
त्यापासून वाचण्यासाठी घरात गॅसचा वास येत असल्यास चुकूनही विद्युत उपकरणं सुरु करायची नाहीत.
गॅसचा उग्र वास येत असेल तर तातडीने खिडक्या दरवाजे उघडा.
रेग्युलेटर तपासावे, रेग्युलेटर बंद केल्यानंतर गॅस लिक होत असल्यास रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप लावा
गॅसचा वास बाहेर घालवण्यासाठी चुकूनही पंखा सुरु करु नये.
अगरबत्ती किंवा दिवा घरात सुरु ठेवू नका त्याने गॅसचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
गॅस लीक झाल्याने त्याच्या वासाने जास्त त्रास होत असेल तर तोंडावर मास्क किंवा कपडा बांधा. तसेच गॅस डिलरशी संपर्क साधा.
घरात गॅसचा वास आल्यावर या गोष्टींचं पालन केल्यास तुमच्या घरात गॅस सिलिंडरचा स्पोट होणार नाही.