Rule Change In March : जीएसटी ते गॅस सिलिंडरची किंमत, मार्चमध्ये अनेक मोठे बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Rule Change From 1st March: मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच LPG सिलिंडर महागलं आहे. Fastag KYC आणि जीएसटीच्या नियमांतही बदल झाला आहे, तो आपण जाणून घेऊ या.
Rule Change In March
Rule Change In MarchSaam Tv
Published On

Lpg Price Hike In March

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक बदल होतात. १ मार्च २०२४ पासून काही नियम बदलले आहेत. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होत आहे. फास्टॅग केवायसीची शेवटची तारीख संपली आहे. कालपासून देशात आणखी कोणते बदल झाले आहेत, ज्याचा खिशावर परिणाम होणार आहे, ते आपण पाहू या. (Latest Business Update)

गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. १ मार्चपासून कंपन्यांनी पुन्हा एकदा १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली (Lpg Price Hike) आहे. मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार धक्का बसला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर १७२३ रुपयांवरून १७४९ रुपयांपर्यंत वाढला आहे. यावेळी १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फास्टॅग केवायसीची मुदत

देशात FASTag KYC ची अंतिम मुदत ३१ मार्चपासून संपत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने FASTag KYC अपडेट करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.

जीएसटीच्या नियमांमध्ये बदल

१ मार्च २०२४ पासून जीएसटीच्या (GST) नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या अंतर्गत आता ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-वे बिल जारी करता येणार नाही. जर वार्षिक उलाढाल रु. ५ कोटींपेक्षा असेल तर व्यावसायिक ई-इनव्हॉइस तपशील समाविष्ट केल्याशिवाय ई-वे बिल जारी करू शकणार नाहीत. जीएसटी प्रणाली अंतर्गत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल पाठवण्यासाठी ई-वे बिल आवश्यक आहे.

SBI क्रेडिट कार्डशी संबंधित नियम

या महिन्यात SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आणखी एक मोठा बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या क्रेडिट कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या १५ मार्चपासून हे नवे नियम लागू (SBI Credit Card) होतील. या अंतर्गत, SBI नियमांमध्ये बदल करणार आहे. त्याची तपशीलवार माहिती एसबीआयद्वारे वापरकर्त्यांना मेलद्वारे दिली जाणार आहे.

१४ दिवस बँकांना सुट्टी

या महिन्यात बँकांना १४ दिवस सुट्टी (Bank Holiday) आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर आरबीआयने जारी केलेली बँक हॉलिडे मार्च लिस्ट पाहूनच घराबाहेर पडा. वास्तविक, या महिन्यात महाशिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे हे सण आहेत. या दिवशीही बॅंका बंद राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com