लहान मुलांना खेळताना कसंही बसायला आवडतं. मुलं कुठेही बसतात, कशीही बसतात. बऱ्याचदा तुम्ही मुलांना पाहिलं असेल की, ते गुडघे उलटे ठेवून म्हणजे W या अक्षरासारखे बसतात. पालक बऱ्याचदा त्यांना ओरडूनही त्यांच्या ते लक्षात राहत नाही. कारण त्यांना ही बसण्याची पद्धत रिलॅक्सिंग वाटते. पण तज्ज्ञांच्या मते ही बसण्याची पद्धत त्यांना भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जायला भाग पाडू शकते. पुढील बातमीत आपण या बसण्याच्या पद्धतीमुळे होणारं नुकसान आणि काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
लहान मुलं जर घरात सतत पाय मोडून म्हणजे W शेपमध्ये बसत असतील तर त्यांचे पाय वाकडे होऊ शकतात. तसेच चालतानाही ते वाकडे पाय घेऊन चालायला लागतात. बऱ्याचदा यामुळे त्यांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मुलं जर वारंवार या आकारामध्ये किंवा Positionमध्ये बसत असतील तर त्यांच्या हिप्स आणि गुडघ्यांवर दबाव पडू शकतो. भविष्यात त्यांना Hip Dysplasia चा धोकाही निर्माण होऊ शकतो. तसेच मुलांच्या कोर मसल्सची योग्य प्रकारे वाढही होत नाही. मग मुलं कमजोर होत जातात.
सगळ्यात मोठा परिणाम हा मुलांच्या चालण्यावरच होतो. याने मुलं ताठ बसत नाहीत. ताठ उभं राहून चालत नाहीत. पाठीला पोक काढून चालतात. याचा परिणाम त्यांना भविष्यातही भोगावा लागू शकतो. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवा. जमल्यास त्यांना समजावून सांगा. त्यांना मांडी घालून बसायला शिकवा. सुरुवातीला मुलं ऐकतं नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून आणि त्यांना वेळ देऊन सवयींमध्ये बदल करायला लावा. जर मुलं जास्त वेळ W Position मध्ये बसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना काही व्यायाम शिकवा. ज्याने मुलांना भविष्यातही फायदा होईल.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.