Parenting Tips
Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतो 'या' टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Exam Stress Tips For children : येत्या काही दिवसांतच लहान मुलांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. हा परीक्षेचा काळ अतिशय गंभीर असतो. बऱ्याचदा लहान मुलं त्यांचा कोर्स पूर्ण करण्यासोबतच आपल्या क्लासमध्ये चांगले प्रदर्शन करण्याच्या तणावामध्ये असतात.

परीक्षेच्या वेळी लहान मुलांना (Baby) होणाऱ्या या तणावामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशावेळी त्यांच्या रिझल्टवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी आपल्या मुलांना एक्झाम स्ट्रेसपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी या टिप्स फॉलो केल्या पाहिजे.

मुलांवरती दबाव आणू नका -

अनेक आई वडील परीक्षेच्या वेळी आपल्या लहान मुलांवर चांगल्या रिझल्टसाठी अत्याधिक दबाव टाकतात. असं करण्याऐवजी आपल्या मुलांच्या मनामध्ये विश्वास जाहीर करा. असं करून तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन देऊ शकता.

घरामध्ये चांगले वातावरण ठेवा -

मुलांच्या परीक्षेच्या वेळी आई वडिलांनी घरामधील वातावरण सकारात्मक ठेवले पाहिजे. तुमचे मुल आधीपासूनच त्याच्या अभ्यासामुळे आणि येणाऱ्या एक्झाम्समुळे टेन्शनमध्ये असतात. अशावेळी घरामधील खराब व्यवहार तुमच्या लहान मुलांच्या मनावर परिणाम करू शकतो. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत फक्त अभ्यासाविषयी बोलत जा. तुमच्या मुलाला अभ्यास करण्यासाठी मोटिवेट करा आणि त्याला ओरडू नका.

खानपाणावर लक्ष ठेवा -

परीक्षेदरम्यान लहान मुलांना स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी त्यांच्या डायटमध्ये ताज्या आणि हिरव्या भाज्यांचे, फळांचे, ड्राय फ्रुट्स आणि दूध सामील करा. पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने मुलांना ऊर्जा मिळण्यासोबतच एकाग्रता वाढण्यासाठी मदत होईल.

ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे आहे -

तासन तास एकाच जागेवर बसून अभ्यास केल्याने तुमच्या मुलांच्या शरीरावर आणि मेंदूवर तर येऊ शकतो. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासादरम्यान छोटा छोटा ब्रेक घेण्याचा सल्ला द्या. असं केल्याने तुमच्या मुलाचा मूड फ्रेश राहील. सोबतच स्ट्रेस फ्री देखील राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार: नारायण राणेंना विश्वास

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT