Kidney Stone Symptoms and Diet (Details in Marathi) Saam Tv
लाईफस्टाईल

Kidney Stones मुळे वैतागले आहात? या ५ पदार्थांचा आहारात करा समावेश, होईल फायदा

Kidney Stone Symptoms (Details in Marathi): बदललेली जीवनशैली, वाढते वजन आणि इतर अनेक कारणांमुळे मुतखडा होऊ शकतो. याची लक्षणे कोणती? यावर कशी मात मिळवाल पाहूया

कोमल दामुद्रे

How To Cure Kidney Stone:

हिवाळ्यात आपण कमी प्रमाणात पाणी पितो यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते. परंतु, पाणी कमी प्यायल्याने मुतखड्याचा आजार उद्भवतो. कमी पाणी पिणे आणि लघवी थांबवून ठेवल्यामुळे मुतखड्याच्या समस्यांना समोरे जावे लागते.

शरीरात लघवीचे खडे तयार होतात. या आजाराचे (Disease) प्रमाण पुरुषांमध्ये जास्त पाहायला मिळते. मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जो रक्त फिल्टर करतो आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. बदललेली जीवनशैली, वाढते वजन आणि इतर अनेक कारणांमुळे मुतखडा होऊ शकतो. याची लक्षणे (Symptoms) कोणती? यावर कशी मात मिळवाल पाहूया.

1. किडनी स्टोनची लक्षणे (Symptoms)

  • लघवी करताना वेदना

  • लघवी दरम्यान रक्तस्त्राव

  • उलट्या किंवा मळमळ

  • वारंवार मूत्रविसर्जन

  • खालच्या ओटीपोटाच्या भागात वेदना

  • ताप

  • मूत्रसंसर्ग

2. आहारात कोणते पदार्थ खावे? (Diet)

1. ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण कमी असते, जे किडनी (Kidney) स्टोनवर फायदेशीर ठरु शकते. यामध्ये ९० टक्के पाणी असल्याने किडनीसाठी ते फायदेशीर आहे.

2. टरबूज

टरबूजमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, जे मूत्रखडा होण्यापासून रोखू शकते. त्यामुळे याचे सेवन केल्याने किडनी स्टोनपासून सुटका होऊ शकते.

3. दही

दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. याशिवाय दूध आणि चीज देखील यावर फायदेशीर ठरते.

4. संत्री

संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिडचा खजिना आहे, ज्यामुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत होते. यासोबतच लिंबू खाणे देखील किडनीसाठी फायदेशीर आहे.

5. स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी किडनीसाठी गुणकारी आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT