PCOS Problem : मासिक पाळी उशीरा आल्यानं वजन वाढतं का? वेट लॉससाठी ही योगासने करुन पाहाच

Does Late Period Cause : महिलांना दर महिन्याला पाळी येण्याची तारीख मागे पुढे होणे हे खूप सामान्य असले तरी ती नियमित आली नाही की, आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजन वाढते.
PCOS Problem
PCOS ProblemSaam Tv
Published On

Weight Loss Yoga Poses :

वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त आहेत. ही समस्या आजकाल सर्वसामान्य असली तरी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकजण याचे बळी पडताना दिसून येत आहे. अशातच वाढत्या वजनाचा जास्त परिणाम महिलांवर अधिक प्रमाणात दिसून येतं आहे.

महिलांना दर महिन्याला पाळी येण्याची तारीख मागे पुढे होणे हे खूप सामान्य असले तरी ती नियमित आली नाही की, आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाळीमुळे पोट आणि मांड्यांच्या वरच्या भागात दिसून येतं. बरेच महिलांना पीसीओएसचा त्रास देखील असतो. त्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता, चेहऱ्यावरील केस आणि वजन वाढणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने महिलांनी (Women) आरोग्याची (Health) काळजी घ्यायला हवी. शारीरिक हालचालींनी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्यासाठी नियमितपणे काही योगासने (Yoga) केल्यास फायदा होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

PCOS Problem
Yoga For Belly Fat: डबल चिन आणि सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहात? नियमित करा हा योगा, महिन्याभरात दिसेल फरक

1. PCOS ची समस्येमध्ये वजन का वाढते?

PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या समस्येमुळे महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन स्त्री संप्रेरकांपेक्षा अधिक एंड्रोजन पुरुष हार्मोन्स तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे वजन वाढू लागते. वेट लॉस करण्यासाठी कोणती योगासने करायला हवी जाणून घेऊया

2. मालासन

मालासन केल्याने मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात. तसेच पोट कमी होण्यास मदत होते. पचनसंस्था सुधारल्याने वजन नियंत्रणात राहाते. पाठीच्या कणातील त्रास कमी होतो.

3. भुजंगासन

भुजंगासनाला क्रोबा पोज असेही म्हणतात. हे आसन नियमितपणे केल्याने पोटाची चरबी कमी होते. ओटीपोटीच्या स्नायूंना ताणण्यास मदत करते. पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com